
₹1,000 Cr Suit Filed Against HDFC Bank MD: मुंबईतील प्रतिष्ठित लिलावती रुग्णालयाचे व्यवस्थापन आणि संचालन करणाऱ्या लिलावती किर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्ट (एलकेएमएम ट्रस्ट) ने आज HDFC Bacnkचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर जगदीशन यांच्याविरोधात 1000 कोटी रुपयांचा मानहानीचा दिवाणी दावा दाखल केला आहे. ट्रस्ट आणि त्याचे कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत मेहता यांच्याविरोधात केलेल्या ‘खोडसाळ आणि बदनामीकारक विधानां'मुळे ट्रस्टने हा पवित्रा घेण्यात आल्याचे सांगण्याता आले आहे.
(नक्की वाचा: मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये 1200 कोटींचा घोटाळा, संचालकांचाच खळबळजनक आरोप)
HDFC Bank च्या CEO विरोधात फौजदारी तक्रार
ट्रस्टने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी आणि सार्वजनिक धर्मादाय संस्था म्हणून त्यांचे कामकाज रोखण्यासाठी सुरू असलेल्या सुनियोजित मोहिमेला उत्तर देण्यासाठी ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.दिवाणी दाव्याव्यतिरिक्त, ट्रस्टने महानगर दंडाधिकारी, गिरगाव यांच्या न्यायालयात फौजदारी तक्रार देखील दाखल केली आहे. या तक्रारीनंतर न्यायालयाने एचडीएफसी बँकेचे सीईओ, प्रवक्ते आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन प्रमुखांना नोटीस बजावली आहे.
(नक्की वाचा: धारावीतील चर्मोद्योग व्यावसायिकांचा सूर बदलला, पुनर्विकासाबाबत सरकारकडे मोठी मागणी)
HDFC कडून कधीही कर्ज घेतले नाही- प्रशांत मेहता
एलकेएमएम ट्रस्ट आणि प्रशांत मेहता यांनी कधीही एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेतले नाही, उलट, त्यांनी बँकेत 48 कोटी रुपये मुदत ठेवी आणि रोख्यांच्या स्वरूपात जमा केले होते, असे ट्रस्टने स्पष्ट केले आहे. एचडीएफसी बँकेच्या सीईओंनी केलेल्या फसवणुकीच्या आरोपांनुसार, स्प्लेंडर जेम्सशी ट्रस्ट आणि प्रशांत मेहता यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही, असेही ट्रस्टने म्हटले आहे.
HDFC बँकेने आरोप फेटाळले
एचडीएफसी बँकेने त्यांच्यावर केलेले हे आरोप यापूर्वीच फेटाळून लावले होते. बँक आणि तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही व्यक्ती जाणीवपूर्वक लक्ष्य करत असून, ते कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करत आहेत. बँकेचे थकबाकीदार, अर्थात स्प्लेंडर जेम्स लिमिटेड (पूर्वीचे नाव ब्युटीफुल डायमंड्स लिमिटेड) यांच्याकडून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कर्जाची वसुली थांबवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे, असे बँकेचे म्हणणे आहे. बँकेने असेही म्हटले होते की, आम्हाला आमच्या भागधारकांची चिंता असून, खोडसाळ, बदनामीकारक आणि दुष्ट हेतूने निराधार आरोप करणाऱ्यांविरोधात तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात बँक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world