Pune News: भारतातील ट्रॅफिकवर उपाय! उबर ड्रायव्हरचा सल्ला अन् एक वाक्य ऐकून अमेरिकन फाऊंडर थक्क

Pune News: पहाटे 4 च्या सुमारास पुण्याच्या शांत आणि रिकाम्या रस्त्यांवरून उबर कारने प्रवास करत असताना, चालकाने भारताच्या ट्रॅफिक समस्येवर असा काही उपाय सुचवला की, तो ऐकून अमेरिकन फाऊंडर काही काळ शांत आणि अवाक झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

 Viral News: काहीवेळा अगदी सहज सुरू झालेली चर्चा तुमच्या आयुष्याकडे किंवा दैनंदिन गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकते. असाच काहीसा अनुभव अमेरिकेत राहणाऱ्या एका कंपनीच्या फाऊंडरला नुकताच पुण्यात आला. पहाटे 4 च्या सुमारास पुण्याच्या शांत आणि रिकाम्या रस्त्यांवरून उबर कारने प्रवास करत असताना, चालकाने भारताच्या ट्रॅफिक समस्येवर असा काही उपाय सुचवला की, तो ऐकून फाऊंडर काही काळ शांत आणि अवाक झाला.

रिकाम्या रस्त्यावरील चर्चा अन् 11 वर्षांचा अनुभव!

विक गंभीर (Vik Gambhir) यांनी linkedin वर  शेअर केलेल्या अनुभवानुसार, पहाटेची वेळ असल्याने रस्ते शांत होते. चालकासोबत सहज गप्पा सुरू झाल्या आणि अचानक चालकाने देशातील वाहतूक कोंडीचा मुद्दा काढला आणि म्हणाला, "यावर एक अतिशय सोपा उपाय आहे." सुरुवातीला गंभीर यांना वाटले की, नेहमीप्रमाणे कोणीतरी सामान्य सल्ला देत आहे. परंतु, जेव्हा चालकाने सांगितले की त्याने गेली 11 वर्षे रुग्णवाहिका चालवली आहे, तेव्हा या संभाषणाचा रोख पूर्णपणे बदलला.

Advertisement

(नक्की वाचा-  Riyan Angry on V. Sooryavanshi: 96 धावा करणाऱ्या वैभवला रियानने झापलं? RR चा कर्णधार ट्रोलर्सच्या निशाण्यावर)

"ट्रॅफिक अडचण नाही, जीवन-मरणाचा प्रश्न आहे

उबर चालकाने रुग्णवाहिका चालवताना आलेले भयंकर आणि संवेदनशील अनुभव सांगितले. लोक मागून रुग्णवाहिका येत असूनही रस्ता न देणे, जंक्शन ब्लॉक करणे, 'फक्त दोन मिनिटे' म्हणून कुठेही गाडी उभी करणे आणि वेळ वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेलाच ओव्हरटेक करणे, अशा घटना चालकाने अनुभवल्या होत्या.

"जेव्हा तुम्ही स्वतःची कार चालवता, तेव्हा ट्रॅफिक ही तुमच्यासाठी केवळ एक अडचण असते. पण जेव्हा तुम्ही रुग्णवाहिका चालवता, तेव्हा ट्रॅफिक हा जीवन-मरणाचा प्रश्न असतो" हे वाक्य ऐकून अमेरिकन फाऊंडर काही वेळ स्तब्ध झाला. 

(नक्की वाचा- Kalyan News: खोट्या प्रतिष्ठेपायी पित्याने मुलीला संपवलं; 3 दिवसांनंतर हत्येचं धक्कादायक कारण समोर)

चालकाने सुचवला अनोखा उपाय

कोणत्याही ड्रायव्हिंग टेस्टपेक्षा शिस्त आणि रस्त्यावरील भान शिकवण्यासाठी चालकाने सांगितलं की,  भारतात कोणालाही ड्रायव्हिंग लायसन्स देण्यापूर्वी, त्याला किमान एक आठवडा रुग्णवाहिका चालवण्यास सांगावे. फक्त अॅम्बुलन्समध्ये बसायचे नाही, तर प्रत्यक्ष चालवायची. जेव्हा एखादा नवीन चालक मागे रुग्णाचा जीव टांगणीला लागलेला असताना, सायरनच्या आवाजात, कुटुंबातील सदस्यांचा आक्रोश ऐकत ट्रॅफिक सिग्नलवर उभा राहील, तेव्हा त्याला वेळेचे आणि रस्त्यावरील शिस्तीचे खरे महत्त्व कळेल.

आकडेवारी किंवा मोठ्या भाषणांशिवाय, पुण्याच्या रस्त्यावर पहाटे 4 वाजता मिळालेला हा अनुभव प्रामाणिक आणि थेट मनाला भिडणारा ठरला, असे म्हणत या विक गंभीर यांनी चालकाच्या बुद्धिमत्तेचे तोंडभरून कौतुक केले.