इगतपुरी विधानसभा (Igatpuri Assembly Constituency) मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हिरामण भिका खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हिरामण भिका खोसकर यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपत नाना सकाळे यांच्यासह डझनभर समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. विधानसभा (Vidhan Sabha Election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकर आचारसंहिता (Code of Conduct) लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या राजकीय हालचाली घडू शकतात असं चित्र आहे.
नारायण राणे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
नारायण राणे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
दोन्हा नेत्यांमध्ये वर्षावर बैठक सुरु.
कुडाळ कणकवली मतदारसंघाबाबत चर्चा सुरु.
भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या उमेदवारीला भाजपमधून माजी नगरसेवकांचा विरोध
भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या उमेदवारीला भाजपमधून माजी नगरसेवकांचा विरोध. माजी नगरसेवकांची आज बैठक पार पडली. बैठकीत जगताप कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिल्यास काम न करण्याचा केला ठराव. बैठकीला चिंचवड विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक उपस्थित. 15 पेक्षा अधिक माजी नगरसेवक सोबत असल्याचा माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि चंद्रकांत नखाते यांचा दावा.
भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचं पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी याना पक्ष शिस्तीचा भंग केला आणि पक्ष विरोधी कारवाया केल्या म्हणून सहा वर्षांसाठी भाजप मधून निलंबित करण्यात आले आहे. रेड्डी यांनी ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी उमेदवारी घोषित केली त्याविरोधात येत्या 17 ऑक्टोबर रोजी समर्थकांसह राजीनामा देण्याची घोषणा केली होती. यावर मिडिया शी बोलताना भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष शिस्तीचा भंग आणि पक्षाच्या अंतर्गत बाबी उघडपणे मिडीयाशी बोलल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.
बॅलेट युनिटमधील फक्त तुतारी असलेलं चिन्ह आणि तुतारी वाजवणारा माणूस या दोन्ही चिन्हात फरक - केंद्रीय निवडणूक आयोग
विधानसभा निवडणुकीतील बॅलेट युनिटमधील फक्त तुतारी असलेलं चिन्ह आणि तुतारी वाजवणारा माणूस या दोन्ही चिन्हात फरक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह अधिक ठळकपणे दिसावं यासाठी त्यांच्या सांगण्यानुसार बदल करण्यात आलेत.
- केंद्रीय निवडणूक आयोग
एग्झिट पोलने निर्माण केलेल्या अपेक्षांमुळे मोठा गोंधळ निर्माण होतोय - राजीव कुमार
एग्झिट पोलने निर्माण केलेल्या अपेक्षांमुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे. हा माध्यमांसाठी आत्मचिंतनाचा विषय आहे. एग्झिट पोलचं सर्व्हेक्षण कसं करण्यात आलं, सॅम्पल सर्वे काय होता याचाही विचार करायला हवा.
गेल्या काही निवडणुकीत मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वाजून पाच मिनिटांनी टीव्हीवर निकालाचे कल दाखविण्यास सुरुवात होते. हे शक्य नाही. आयोगाची पहिली मतमोजणी 8.30 वाजता सुरू होते. एग्झिट पोलचे समर्थन करण्यासाठी सुरुवातीला वेगळ्याच प्रकारचे कल दाखविण्यात येत आहेत का? असा ही सवाल उद्भवतो.
- राजीव कुमार, केंद्रीय निवडणूक आयुक्त
Live Update : झारखंड विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात पार पडणार
झारखंड विधानसभा निवडणुकीत दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात निवडणूक पार पडतील.
Live Update : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा
Live Update : शंखनाद...! निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीसांचं ट्विट
Live Update : राज्यातील विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजलं, जाणून घ्या सर्व तारखा
राज्यातील विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा केली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. राज्यात एकूण 9 कोटी ६३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी महिला मतदार 4 कोटी 66 लाख आणि पुरूष 4 कोटी 97 लाख मतदार असणार आहेत.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात होणार मतदान
- 20 नोव्हेंबरला मतदान
- 23 नोव्हेंबरला मतमोजणी
- अर्ज दाखल करण्याची तारीख: 29 ॲाक्टोबर
- अर्जाची छाननीः 30 ॲाक्टोबर
- अर्ज मागे घेण्याची तारीखः 4 नोव्हेबर
Live Update : महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार, 23 नोव्हेंबरला निकाल लागणार.
Live Update : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा आल्या समोर, मतमोजणी कधी?
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून त्याच्या तारखा समोर आल्या आहेत.
महाराष्ट्रात मतदानाची तारीख - 20 नोव्हेंबर 2024, बुधवार
महाराष्ट्र मतमोजणीची तारीख - 23 नोव्हेंबर 2024, शनिवारी
Live Update : राज्यात 1 लाख 186 पोलिंग स्टेशन असणार
1 लाख 186 पोलिंग स्टेशन असणार, याशिवाय शहरात ४२,६०४ पोलिंग स्टेशन असतील. ग्रामीण भागात 57,582 पोलिंग स्टेशन
Live Update : वोटर हेल्पलाईन अॅपमध्ये मतदार आपले नाव तपासू शकतील
वोटर हेल्पलाईन अॅपमध्ये मतदार आपले नाव तपासू शकतील, मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती जाणून घेऊ शकतील आणि e-EPIC डाऊनलोड करू शकतील. सी-व्हिजील अॅपद्वारे कोणत्याही गैरप्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येऊ शकेल. यात तक्रारदाराचे नाव गुप्त राखले जाईल. KYC APP मध्ये उमेदवारांविरोधात दाखल गुन्ह्यांचा सगळा तपशील उपलब्ध होऊ शकेल. महाराष्ट्रातील 20 सीमावर्ती जिल्हे आहेत. 6 राज्यांच्या सीमा या महाराष्ट्राशी संलग्न आहेत. यात कर्नाटक, गोवा, तेलंगाणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश गुजरात आणि दादरा नगर हवेली यांच्या सीमा संलग्न आहेत.
मतदान करण्यासाठी केंद्रावर जाऊ न शकणाऱ्यांना घरातून मतदान करण्याची सुविधा...
मतदान करण्यासाठी केंद्रावर जाऊ न शकणाऱ्यांना घरातून मतदान करण्याची सुविधा...- निवडणूक आयोग
Live Update : आगामी निवडणुकीत सर्व बुथवर सुविधा
आगामी निवडणुकीत सर्व बुथवर सुविधा मिळाव्यात यासाठी निवडणूक आयोगाकडून रांगांच्या जवळपास बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
Live Update : महाराष्ट्रात एकूण 9 कोटी 63 लाख मतदार हक्क बजावणार
महाराष्ट्रात एकूण ९ कोटी ६३ लाख मतदार
४.९७ कोटी पुरुष आणि
४.६६ कोटी महिला मतदार आहेत.
१.८५ कोटी तरूण मतदार (२० ते २९ वयोगटात)
२०.९३ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
Live Update : 26 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभेची मुदत संपणार - राजीव कुमार
26 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभेची मुदत संपणार - राजीव कुमार
जम्मू काश्मीर आणि हरियाणा निवडणुकीत एकही चुकीची किंवा हिंसक घटना घडली नाही. - राजीव कुमार
जम्मू काश्मीर आणि हरियाणा निवडणुकीत एकही चुकीची किंवा हिंसक घटना घडली नाही. - राजीव कुमार (मुख्य निवडणूक आयुक्त)
Live Update : हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील सर्व मतदारांचे आभार - राजीव कुमार
हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील सर्व मतदारांचे आभार, राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातील मानले मतदारांचे आभार...
Live Update : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात...
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात...
Live Update : महाराष्ट्रातील मतदारांचा थोडक्यात आढावा...
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी एकूण मतदारसंघ 288 आहेत. 25 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी तर 29 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. महाराष्ट्रात एकूण 9.59 कोटी मतदार आहेत. यामध्ये 4.95 कोटी पुरुष मतदार आहेत तर 4.46 कोटी महिला मतदार आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 इतकी आहे तर दिव्यांग मतदारांची संख्या 6.32 लाख इतकी आहे. 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 12.48 लाख इतकी आहे तर 100 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या 49034 इतकी आहे. 18-19 वर्षांच्या आणि पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांची संख्या 19.48 लाख इतकी आहे.
Live Update : महाराष्ट्रात कधी होणार निवडणूक, किती टप्प्यात? थोड्याच वेळात घोषणा
लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला होणार सुरुवात.. महाराष्ट्रासह झारखंड राज्याच्या निवडणुकीच्या तारखांचीही घोषणा होणार आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर खासदार अमोल कोल्हे यांच्या भेटीला
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या भेटीनंतर रविकांत तुपकर अमोल कोल्हे यांच्या भेटीला गेले होते. पुण्यातील सर्किट हाऊस मध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली.
Live Update : राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा
नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पात्रात 3 हजार 962 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
गेल्या तीन-चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पूर पाणी आलं असल्याने नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पात्रात 3 हजार 962 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 54.60 टीएमसी इतका पाण्याचा विसर्ग आज सकाळी सहा वाजेपर्यंत करण्यात आला आहे.
Live Update : पुण्यात खासदार अमोल कोल्हेंची बैठक
पुण्यात खासदार अमोल कोल्हेंची बैठक
पुणे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत अमोल कोल्हे यांची बैठक सुरू आहे. जुन्नर आणि खेड विधानसभा मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्त्यांसोबत अमोल कोल्हे संवाद साधतील. पुण्यातील सर्किट हाऊस येथे बैठकीला सुरुवात झाली असून ते दोन मतदार संघातील इच्छूक उमेदवारांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे.
श्रीनिवास पवार सध्या शरद पवार यांच्या भेटीला
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी श्रीनिवास पवार सध्या शरद पवार यांच्या भेटीला आले आहे. बारामती मतदारसंघांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
निवडणूक लढवणार की पाडणार? आचारसंहितेची घोषणा झाल्यावर मनोज जरांगे भूमिका स्पष्ट करणार
आचारसंहितेची घोषणा झाल्यावर मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आचारसंहिता लागेपर्यंत जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे निवडणूक लढवणार की पाडणार यावर जरांगे काय निर्णय घेतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगेंची पत्रकार परिषद होऊ शकते असं म्हटलं जात आहे.
Live Update : महाविकास आघाडीचा जागावाटप उद्या जाहीर होणार
महाविकास आघाडीचं (MVA) जागावाटप उद्या जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत जागावाटप जाहीर होणार असल्याची माहिती आहे. यासाठीची महाविकास आघाडीची पत्रकार परिषद उद्या 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे. महाविकास आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढणार याचीही माहिती उद्या कळू शकेल.
Live Update : लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. आज निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार आहे. त्याशिवाय आज दुपारपासून राज्यभरात आचारसंहिता लागेल. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आज शेवटचा दिवस आहे. ज्या महिलांनी अर्ज केला नाही त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव खासगी बसची दुचाकीला जोरदार धडक
मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव खासगी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नगाव परिसरात काल रात्रीच्या सुमारास घडली. अनिल गुलाब पाटील (वय 55) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक एअरपोर्टवर
थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक एअरपोर्टवर दाखल होतील तिथून ते आमदार सरोज आहिरे यांच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांचे भूमिपूजन करत जाहीर सभा घेतील
महायुतीच्या राज्यपाल नियुक्त जागा नियुक्त केल्या तर ठाकरे गट पुन्हा न्यायालयात जाण्याच्या तयारीत...
महायुतीच्या राज्यपाल नियुक्त जागा नियुक्त केल्या तर ठाकरे गट पुन्हा न्यायालयात जाण्याच्या तयारीत...
12 पैकी महायुतीतील 7 जणांची नाव निश्चित केल्यानंतर ठाकरे गटाकडून न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. सोमवारी 7 ऑक्टोबरला सदर याचिकेचे युक्तिवाद पूर्ण झाले आहे तर अजूनही निकाल बाकी आहे.
या याचिकेचा निर्णय राखीव असताना आणि वादग्रस्त विषयाचा निर्णय प्रलंबित असताना त्या विषयावर निर्णय घेणे उचित होणार नाही असं ठाकरे गटाच म्हणणं आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांनी जर या नावांवर मान्यता दिली तर त्यांच्याविरुद्ध ठाकरे गट उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती
अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा धमकीचं पत्र
अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा धमकीचं पत्र
8 दिवसात नवनीत राणा यांना दुसऱ्यांदा धमकी दिली आहे. 8 दिवसांआधी अमीर नावाच्या व्यक्तीकडून पत्र आल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. त्यानेच 8 दिवसानंतर पुन्हा पत्रव्यवहार केला.या पत्रात अद्याप पैसे पोहचले नसल्याचा उल्लेख असून अश्लिल भाषा वापरण्यात आली आहे. नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक यांनी पुन्हा राजापेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.