1 month ago
मुंबई:

येत्या काही दिवसांत विधानसभा (Vidhan Sabha Election) निवडणुका घेण्यात येणार असून आजच आचारसंहिता (code of conduct) लागण्याची शक्यता (Maharashtra Election) व्यक्त केली जात आहे. आज आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने कॅबिनेट बैठक सकाळी लवकर बोलवल्याचं सांगितलं जात आहे. आज निवडणूक आयोग राज्यात आचारसंहिता जाहीर करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

Oct 14, 2024 21:36 (IST)

डहाणूमध्ये शेतात काम करताना वीज कोसळल्याने दोन महिला गंभीर जखमी

डहाणू तालुक्यातील धरमपूर येथील शेतात काम करत असताना विजेच्या धक्क्यामुळे दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.  वंदना संजय भगत (वय 25) ,राहणार धरमपूर आणि ज्योती वसंत हिंगाडी (वय 19), राहणार बापूगाव या दोन विवाहित महिलांवर संध्याकाळच्या सुमारास विज कोसळली. त्या आपल्या शेतात भात गोळा करत असताना अचानक विजांचा कडकडाट होत विजेचा प्रचंड आघात झाला. वीज कोसळल्यानंतर दोन्ही महिलांना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही महिलांची प्रकृती अजूनही गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Oct 14, 2024 21:35 (IST)

चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एग्झिट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एग्झिट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Oct 14, 2024 18:42 (IST)

पुणे बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण, आणखी एका आरोपीला अटक

पुणे बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण 

पुण्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणी पुणे पोलिसांकडून आणखी एका आरोपीला अटक 

याप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपी अटक तर अजून एक आरोपी फरार 

पुण्यातील बोपदेव घाटात तिघांनी मिळून 21 वर्षीय तरुणीवर केला होता सामूहिक बलात्कार

Oct 14, 2024 18:39 (IST)

इस्रायलचा उत्तर लेबनानवर हवाई हल्ला

इस्रायलनं उत्तर लेबनानमधील एका गावावर सोमवारी मोठा हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती लेबनानच्या रेड क्रॉसनं दिली आहे. सोमवारी आयटो गावातील एका इमारतीवर हा हल्ला करण्यात आला. 

Advertisement
Oct 14, 2024 18:02 (IST)

नागपूरच्या रामटेकमध्ये 4 विद्यार्थ्यांचा कालव्यात बुडून मृत्यू

नागपूर : रामटेक तालुक्यात कांद्रीनजिक वसतिगृहातील चार विद्यार्थ्यांचा कालव्यात बुडून मृत्यू, एक विद्यार्थ्याचा मृतदेह मिळाला आहे. दुपारी पोहायला गेले असताना दुर्घटना घडली. पेंच धरणातील कालव्यांचा भाग असलेल्या नवरगावजवळील घोटी टोक उपकालव्यात बुडून मृत्यू चौघांचा मृत्यू. आता कालव्यातील पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आला असून अन्य मृतदेहांचे शोध घेणे सुरू आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यात येत आहे.

Oct 14, 2024 17:58 (IST)

बदलापूर गावात मुसळधार पावसामुळे मोठं झाड कोसळलं

बदलापूर गावात मुसळधार पावसामुळे मोठं झाड कोसळलं

चिंतामणी चौक ते आमदार किसन कथोरे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाड कोसळलं

एका कारचं मोठं नुकसान, सुदैवानं कुणालाही इजा नाही

तर बाजूचा विजेचा पोलही तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित

अग्निशमन दलाकडून झाड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू

Advertisement
Oct 14, 2024 17:51 (IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दिल्लीला जाण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील रात्री दिल्लीत जातील. आज रात्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.  उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेपूर्वी या बैठकीला विशेष महत्व आहे. 

Oct 14, 2024 17:50 (IST)

कल्याण-डोंबिवलीत सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात

कल्याण-डोंबिवलीत सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. साचलेल्या पाण्यातूनच नागरिकांसह वाहन चालकांना वाट काढावी लागली.  परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान होत असल्याने कल्याण-डोंबिवलीच्या आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकरी धास्तावले आहे.

Advertisement
Oct 14, 2024 17:46 (IST)

भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या निवासस्थानी पुन्हा धमकीचे पत्र

भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या निवासस्थानी पुन्हा धमकीचे पत्र

आठ दिवसांत दुसऱ्यांदा आले धमकीचे पत्र; पैसे केव्हा देता असा पत्रात उल्लेख

मागे ज्या व्यक्तीने पत्र दिले होते त्याच नावाच्या व्यक्तीकडून पुन्हा नवणीत राणा यांना धमकीचे पत्र

Oct 14, 2024 17:43 (IST)

भिवंडीत परतीच्या पावसाचा धुमाकूळ, ग्रामीण भागात वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले

भिवंडी शहर व ग्रामीण भागात परतीच्या पावसाने जोरदार थैमान घातले असून, विजेच्या कडकडाट ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली असून तालुक्यातील ग्रामीण भागात हाहाकार उडाला आहे. भिवंडी तालुक्यातील करंजोटी गावात या पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. ग्रामीण भागातील विजेच्या तारा आणि खांबावर पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. विजेच्या कडकडाटासह आलेल्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी बत्तीगुल झाली असून विशेषत: भातशेतीचेही नुकसान झाले आहे.

Oct 14, 2024 16:36 (IST)

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : प्रवीण लोणकरला पोलीस कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आरोपी प्रवीण लोणकरला मुंबईतील किला कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. प्रवीण लोणकर हा या प्रकरणातील फरार आरोपी शुभम लोणकरचा भाऊ आहे. त्यानं बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांच्या राहण्याची सोय केली होती.

Oct 14, 2024 15:53 (IST)

पुणेकरांसाठी गुड न्यूज, पुण्यात आणखी दोन नवे मेट्रो मार्ग!

पुणेकरांसाठी गुड न्यूज, पुण्यात आणखी दोन नवे मेट्रो मार्ग !

१) खडकवासला-स्वारगेट-हडपसर- खराडी

२) नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग

या दोन मेट्रो मार्गांना महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली असून यामुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार आहे.

Oct 14, 2024 15:52 (IST)

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आरोपी प्रवीण लोणकर याला आज किला कोर्टात हजर केलं जाणार

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आरोपी प्रवीण लोणकर याला आज किला कोर्टात हजर केलं जाणार आहे. 

प्रवीण लोणकरने बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांची राहण्याची सोय केली होती. प्रवीण लोणकर हा शुभम लोणकरचा भाऊ आहे. प्रवीण लोणकर याच्या बाबतीत पोलिसांकडून न्यायालयात काही नवीन माहिती दिली जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Oct 14, 2024 14:16 (IST)

Live Update : झिशान सिद्दीकीदेखील होता शूटरच्या निशाण्यावर, चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. बाबा सिद्दीकी यांचा पूत्र झिशान सिद्दीकीदेखील शूटरांच्या निशाणावर होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेल्या आरोपींनी सांगितलं की, आमदार झिशानदेखील लॉरेन्स बिश्नोई गँगच्या टार्गेटवर होते. आरोपींना झिशान आणि बाबा सिद्दीकी या दोघांच्या हत्येची सुपारी दिली होती. जर त्या दोघांना एकत्र मारण्याची संधी मिळाली नाही तर जो समोर दिसेल त्याला आधी मारा, असे आदेश शूटर्सना मिळाल्याचं त्यांनी चौकशीदरम्यान सांगितले. 

Oct 14, 2024 13:01 (IST)

Live Update : शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांची टोलमाफीवर प्रतिक्रिया

शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांची टोलमाफीवर प्रतिक्रिया

 

आज राज्य मंत्रिमंडळाने  मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवर हलक्या वाहनांसाठी टोलमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला टोलपासून मुक्ती दिली. हीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2014 पासून वारंवार व्यक्त केली होती आणि त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्नही देखील केले होते. आज सरतेशेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात टोलमाफीचा निर्णय घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो.

Oct 14, 2024 11:49 (IST)

शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एच एन रिलायन्स हॉस्पिटल येथे चेकअपसाठी पोहोचले

शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एच एन रिलायन्स हॉस्पिटल येथे चेकअपसाठी पोहोचले 

Oct 14, 2024 10:19 (IST)

Live Update : कौशल्य विकास विद्यापीठाला रतन टाटा यांचे नाव

मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास विद्यापीठाला रतन टाटा यांचे नाव दिलं जाणार आहे. याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. याशिवाय सर्व आयटीआयमध्ये संविधान मंदिर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहातील मंत्रिमंडळ बैठक सभागृहात सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य  उपस्थित आहेत.

Oct 14, 2024 09:00 (IST)

Live Update : आज मुंबईत गडगडाट आणि हलक्या सरींचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने आज मुंबईत गडगडाट आणि हलक्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. तर ठाणे आणि पालघरसाठी यलो इशारा जारी केला आहे. IMD नुसार, ठाणे आणि पालघरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. तसेच वेगळ्या भागात 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे वाहतील. 

Oct 14, 2024 08:58 (IST)

Live Update : मुंबईतून न्युयॉर्कला जाणाऱ्या विमानात बॉम्बची धमकी

मुंबईतून न्युयॉर्कला जाणाऱ्या विमानात बॉम्बची धमकी दिल्यानंतर फ्लाइट दिल्लीला वळविण्यात आलं आहे. तरी या प्रकरणात तपास सुरू आहे. 

Oct 14, 2024 08:13 (IST)

कोलकाता प्रकरणाच्या निषेधार्थ देशभरातील IMA संघटना उपोषण करणार

कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या निषेधार्थ 5 ऑक्टोबरपासून उपोषणावर बसलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या समर्थनार्थ इंडियन मेडिकल एसोसिएशनने उपोषण करण्याची घोषणा केली आहे.  IMA ने रविवारी एक निवेदन जारी केले असून, ज्यात देशभरातील IMA संघटनेमधील डॉक्टर 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत उपोषण करणार आहे.