लंडनवरून येऊन तरुण मतदाराने बजावला मतदानाचा हक्क

डॉ. किरण तुळसे हे मागील सहा वर्षांपासून लंडन येथे स्थायिक आहेत. ते खास मतदानासाठी भारतामध्ये आले होते.

जाहिरात
Read Time: 1 min
पुणे:


पुणे जिल्ह्यातल्या पुणे, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (13 मे) मतदान झालं. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सरकारी यंत्रणा तसंच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात आली. तरुण मतदारांमध्ये मतदानाचा मोठा उत्साह दिसला. त्याचबरोबर वेगवेगळ्या मतदान केंद्रावर परदेशातील नागरिक आले होते.  डॉ. किरण तुळसे या तरुणानं थेट लंडनहून येऊन मतदानाचा हक्क बजावला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पिंपरी चिंचवड मधील  डॉ. किरण यांनी सोमवारी दुपारी आपल्या आई वडिलांसह थेरगाव येथील एम. एम. हायस्कूलमध्ये मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. डॉ. किरण तुळसे हे मागील सहा वर्षांपासून लंडन येथे स्थायिक आहेत. 

( नक्की वाचा : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात 59.64% तर देशात 67.25% मतदान )

आई, वडिलांचा सामाजिक कार्याचा आदर्श माझ्या डोळ्यापुढे आहे. नोकरी करून कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना मतदान करणे ही देखील आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे, हा विचार त्यांना मनात सतत येत होता. प्रत्येकाच्या  मताने लोकशाही बळकट होत असते.  त्यामुळे मी आवर्जून लंडन येथून फक्त या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आलो आहे, असे डॉ. तुळसे यांनी सांगितले.

Topics mentioned in this article