'लाडक्या बहिणीं'पेक्षा जास्त निधी, बेरोजगारांना दरमहा 4 हजार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 'या' 6 गोष्टींवर फोकस

आज दिल्लीत आयोजित केलेल्या काँग्रेसच्या बैठकीत (Congress Meeting) महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

रामराजे शिंदे, प्रतिनिधी

आज दिल्लीत आयोजित केलेल्या काँग्रेसच्या बैठकीत (Congress Meeting) महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. दिल्लीतील काँग्रेस बैठकीत जाहीरनाम्यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांना (Vidhan Sabha Election) दरमहिना दोन हजार रुपये देणार असल्याचा उल्लेख आहे. शिंदे सरकारच्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये दिले जात आहे. मात्र काँग्रेसच्या (Congress Menifesto) जाहीरनाम्यानुसार,  महिलांना दरमहा दोन हजार रुपये दिले जाणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्ज माफ केलं जाणार असल्याचीही माहिती आहे

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या बाबी..

1. कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजनाः 

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंत कर्ज माफ केलं जाणार…

ही कर्जमाफी साधारण 28 हजार कोटीची असेल

2. महालक्ष्मी योजनाः

महिलांना प्रति महा 2000 रूपये देणार

यासाठी 60 हजार कोटीचा निधी अपेक्षित आहे.

Advertisement

नक्की वाचा - Mumbai Toll Tax Free : मुंबई टोलमुक्त, कोणत्या वाहनांना सूट मिळणार? प्रवाशांची किती बचत होणार?

3. स्री सन्मान योजनाः

या योजनेअंतर्गत महिलांना बस वाहतूक सेवा पुर्णपणे मोफत चालवली जाणार…

या योजनेसाठी 1 हजार 460 कोटीचा निधी अपेक्षित आहे

4. कुटुंब रक्षणः

सर्वांना 25 लाख रूपयांचं विमा कवच

या योजनेसाठी 6 हजार 556 कोटीचा निधी अपेक्षित आहे.

5. युवकांना शब्दः

बेरोजगारांना महिन्याला 4 हजार रूपये दिले जाणार…

साधारण 6.5लाख युवकांना हा भत्ता दिला जाणार

6. समतेची हमीः

दलित, अल्पसंख्याकांसाठी विशेष योजना राबवल्या जातील..

या योजनेअंतर्गत साधारण 8.5 कोटी लोकांना फायदा दिला जाणार