Tukaram Mundhe: हॉटेलमध्ये Paneer मागवण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा! तुकाराम मुंढेंनी 'या' पनीरवर घातली बंदी

Tukaram Mundhe FDA News : राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅटरर्सकडे मिळणाऱ्या पनीरबाबत एक अत्यंत मोठी बातमी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Tukaram Mundhe : पनीर समजून लोक जे खात आहेत, ते मुळात दुधापासून बनलेलेच नाही, असा खळबळजनक खुलासा तुकाराम मुंढे यांनी केलाय.
मुंबई:

Tukaram Mundhe FDA News : राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅटरर्सकडे मिळणाऱ्या पनीरबाबत एक अत्यंत मोठी बातमी आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध सर्वात मोठा आणि धडक निर्णय घेत राज्यात 'अनलॉग पनीर' किंवा 'नॉन डेअरी पनीर'वर थेट 1 वर्षासाठी पूर्ण बंदी घातली आहे. 30 जुलै रोजी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून, आता बनावट पनीरची निर्मिती, साठवणूक, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

का घातली बंदी?

पनीर समजून लोक जे खात आहेत, ते मुळात दुधापासून बनलेलेच नाही, असा खळबळजनक खुलासा तुकाराम मुंढे यांनी केला आहे. अनलॉग पनीर हे दुग्धजन्य पदार्थ नसून ते वनस्पती तेल किंवा पामतेलचा वापर करून तयार केले जाते. दिसायला ते हुबेहूब खऱ्या पनीरसारखेच असल्याने सर्वसामान्य नागरिक आणि खवय्ये ते सहज ओळखू शकत नाहीत. 

Advertisement

या बनावट पनीरमुळे लोकांची मोठी फसवणूक होत होती आणि त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत होते. हाच धोका ओळखून प्रशासनाने 'सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' या मोहिमेअंतर्गत हा निर्णय घेतला आहे.

( नक्की वाचा : Fake Milk : तुमच्या घरातील दुधात शॅम्पू तर नाही ना? तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा, असे ओळखा बनावट दूध )

FDA चा सर्जिकल स्ट्राईक

गेल्या 1 वर्षात अन्न आणि औषध प्रशासनाने बाजारातून पनीरचे विविध नमुने ताब्यात घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान एकूण 308 नमुन्यांपैकी तब्बल 109 नमुने नियमबाह्य आणि आरोग्यासाठी अत्यंत घातक आढळले. या धक्कादायक अहवालानंतर अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम 30 आणि कलम 3 च्या अंतर्गत मिळालेल्या विशेष विशेषाधिकारांचा वापर करत तुकाराम मुंढे यांनी या बनावट पनीरवर बंदीचा आदेश जारी केला.

( नक्की वाचा : Dental Care Tips: महागड्या ट्रीटमेंटची गरज नाही! 'या' सोप्या उपायाने तुमचे पिवळे दात होतील पांढरेशुभ्र )
 

1 वर्षानंतर काय होणार?

या निर्णयामुळे आता हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, मॅरेज कॅटरर्स आणि क्लाउड किचन्स यांना अनलॉग पनीरचा वापर किंवा साठवणूक करता येणार नाही. अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करून कोणीही अनलॉग पनीर विकताना किंवा वापरताना आढळल्यास त्याच्यावर थेट गुन्हे दाखल केले जातील. पुढील 1 वर्षासाठी ही बंदी कायम असणार असून, 1 वर्षानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


Topics mentioned in this article