Teeth Whitening Home Remedies: चार चौघात बोलताना किंवा हसताना दातांचा पिवळेपणा आड येतोय? मग ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आजकाल चहा, कॉफी, तंबाखू, स्मोकिंग आणि ओरल हायजीनची योग्य काळजी न घेतल्यामुळे दातांवर पिवळा थर जमणे ही अतिशय सामान्य समस्या झाली आहे. हा पिवळेपणा घालवण्यासाठी अनेक जण महागडे टूथपेस्ट, टीथ व्हाइटनिंग प्रॉडक्ट्स आणि क्लिनिकमधील ट्रीटमेंटचा सहारा घेतात.
पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या अवघ्या 2 वस्तू तुमच्या दातांची चमक परत आणू शकतात? योग, आयुर्वेद, नाडी विज्ञान आणि न्यूरोथेरपी तज्ज्ञ डॉ. राम अवतार यांनी दातांची स्वच्छता आणि ओरल हेल्थ सुधारण्यासाठी मोहरीचे तेल आणि सैंधव मिठाशी संबंधित एक पारंपरिक आणि अतिशय सोपा घरगुती उपाय सांगितला आहे.
दातांवर पिवळेपणा नेमका कशामुळे येतो?
तज्ज्ञांच्या मते, आपली बदलती जीवनशैली आणि रोजच्या काही लहान-सहान सवयी या समस्येला कारणीभूत आहेत. चहा किंवा कॉफीचे अतिसेवन, गुटखा, स्मोकिंग आणि योग्य पद्धतीने ब्रश न करणे, या सगळ्या गोष्टींमुळे दातांच्या वरच्या भागावर एक पिवळा थर म्हणजेच प्लॅक जमा होऊ लागतो.
डॉ. राम अवतार यांनी याबाबत सांगितलं की, लोक अनेकदा महागडे टूथपेस्ट आणि केमिकल असलेल्या ट्रीटमेंटच्या मागे धावतात. मात्र आयुर्वेदात यावर अतिशय सोपे, सुरक्षित आणि नैसर्गिक उपाय उपलब्ध आहेत.
( नक्की वाचा : Monsoon Home Tips: पावसाळ्यात घरात चिचुंदरीचा सुळसुळाट झालाय? एका घरगुती उपायाने अवघ्या 5 मिनिटांत पळवून लावा! )
तुमच्या घरातील 2 पदार्थ करतील कमाल
दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी बाजारातून कोणतीही महागडी वस्तू आणण्याची गरज नाही. तुमच्या घरात असलेले शुद्ध मोहरीचे तेल आणि सैंधव मीठ हे दोन पदार्थ कमाल करू शकतात.

कसा करायचा हा उपाय?
1. अर्धा चमचा शुद्ध मोहरीचे तेल घ्या.
2. त्यात एक चिमूटभर बारीक वाटलेले सैंधव मीठ मिसळा.
3. तयार झालेली ही पेस्ट आपल्या बोटाने दात आणि हिरड्यांवर हलक्या हाताने मसाज करा.
4. सुमारे 2 ते 3 मिनिटे हलक्या हाताने घासल्यानंतर कोमट पाण्याने गुळणी करा.
( नक्की वाचा : Monsoon Home Care: पावसाळ्यात घराच्या भिंतींना ओल आलीय? खिशातला एकही रुपया खर्च न करता 'अशी' मिळवा सुटका )
हे मिश्रण कसे काम करते?
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सैंधव मिठामध्ये नैसर्गिकरीत्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे गुणधर्म दातांवर जमलेला हट्टी पिवळेपणा साफ करण्यास मदत करतात. दुसरीकडे, मोहरीचे तेल हिरड्यांना मजबूत करते आणि तोंडाची दुर्गंधी पूर्णपणे नाहीशी करते.
तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय केला, तर अवघ्या काही दिवसांत स्पष्ट फरक दिसेल. तुमचे दात केवळ पांढरे होणार नाहीत, तर हिरड्या देखील पूर्वीपेक्षा जास्त निरोगी होतील.
( नक्की वाचा : शरीराचा सर्वात घाण भाग कोणता? नाव ऐकून बसेल मोठा धक्का; दुर्लक्ष केल्यास उद्भवू शकतात 'या' गंभीर समस्या )
उपाय करताना कोणती काळजी घ्यावी?
हा उपाय सांगताना डॉ. राम अवतार यांनी एक महत्त्वाची सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही दिला आहे. दररोज आणि खूप जोरात मीठ रगडू नका. आठवड्यातून केवळ दोन किंवा तीन वेळाच याचा वापर करणे पुरेसे आहे. अन्यथा दातांचा वरचा संरक्षक थर म्हणजेच इनेमल खराब होण्याचा धोका असतो.
याशिवाय, दिवसातून 2 वेळा ब्रश करण्याची सवय लावा आणि रात्री झोपण्यापूर्वी गुळणी करायला अजिबात विसरू नका.
हा उपाय कुणी अजिबात करू नये?
मोहरीचे तेल आणि सैंधव मिठाचे मिश्रण पारंपरिक पद्धतीने वापरले जात असले, तरी हा उपाय प्रत्येकासाठी योग्य ठरेलच असे नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय याचा अतिवापर टाळावा. खालील व्यक्तींनी हा उपाय करणे टाळावे:
- ज्यांच्या दातांमध्ये आधीपासूनच जास्त संवेदनशीलता (Sensitivity) आहे.
- ज्यांच्या हिरड्यांतून रक्त येते किंवा हिरड्यांचे आजार (Gum Disease) आहेत.
- ज्यांच्या दातांचे इनेमल (Enamel) कमकुवत किंवा घासले गेले आहे.
- ज्यांच्या तोंडात फोड, जखम किंवा अलीकडेच कोणतीही डेंटल ट्रीटमेंट झाली आहे.
- लहान मुलांच्या बाबतीत डेंटिस्टच्या सल्ल्याशिवाय असे घरगुती उपाय करू नयेत
.
डेंटिस्ट काय सल्ला देतात?
- दिवसातून 2 वेळा नियमित ब्रश करा.
- फ्लॉसिंग करा.
- तंबाखू आणि स्मोकिंगपासून दूर राहा.
- गरज भासल्यास डेंटिस्टकडून प्रोफेशनल क्लिनिंग करून घ्या.
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न: दात पिवळे का होतात?
उत्तर: चहा, कॉफी, तंबाखू, धूम्रपान, ओरल हायजीनकडे दुर्लक्ष आणि वाढते वय ही दात पिवळे होण्याची मुख्य कारणे आहेत.
प्रश्न: रोज मिठाने दात साफ करावेत का?
उत्तर: नाही. मिठाचा जास्त वापर केल्यास दातांचा वरचा थर म्हणजेच इनेमल खराब होऊ शकतो.
प्रश्न: दात पांढरे करण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग कोणता?
उत्तर: नियमित ब्रशिंग, फ्लॉसिंग आणि गरज असल्यास डेंटिस्टचा सल्ला घेणे हाच सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो.
प्रश्न: पिवळे दात हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकतात का?
उत्तर: होय, काही प्रकरणांमध्ये दातांचा रंग बदलणे हे औषधांचे दुष्परिणाम, इनेमलची समस्या किंवा दातांच्या इतर विकारांशी संबंधित असू शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world