36 वर्षांपूर्वी सुनील गावसकरांना भूखंड दिला, काहीच काम झाले नाही; आता राज्य सरकारचा स्ट्रेट ड्राईव्ह

या भूखंडाचा वापर आसपासचे झोपडीधारक अनावश्यक कामांसाठी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी पार पडली. या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. वांद्रे येथील 2 हजार चौरस मीटरचा भूखंड 30 वर्षांसाठी भाडेपड्ड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भूखंडाचा वापर आसपासचे झोपडीधारक अनावश्यक कामांसाठी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा भूखंड यापूर्वी माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना इनडोअर क्रिकेट प्रक्षिशण केंद्रासाठी देण्यात आला होता. 

नक्की वाचा : 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं वाटलं नव्हतं', तर रश्मी ठाकरे... गोगावलेंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार हा भूखंड 1988 साली माजी क्रिकेटपटू, लिटील मास्टर सुनील गावसकर यांना भाडेपट्ट्याने देण्यात आला होता. गावसकर यांना इनडोअर क्रिकेट प्रक्षिशण केंद्रासाठी हा भूखंड देण्यात आला होता. मात्र त्यावर गावसकर यांनी कोणतेही काम केले नव्हते. यामुळे हा भूखंड सरकारने परत घेण्याचा निर्णय घेतला होता. या भूखंडावर कोणतेही काम न झाल्याने क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सूसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सूसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रे येथील भूखंड देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 

Advertisement

नक्की वाचा : 'आमच्या चौथ्या टर्मची खात्री नाही, पण... ' नितीन गडकरींनी जाहीरपणे सांगितलं

2 हजार स्क्वेअर मीटरच्या या भूखंडावर काहीही काम झाले नसल्याने आजूबाजूच्या झोपडपट्टीवासीयांनी त्याचा अनावश्यक कामांसाठी वापर करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे हा भूखंड पुन्हा ताब्यात घ्यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानुसार म्हाडा प्राधिकरणाने याबाबतचा निर्णय घेतला आणि हा भूखंड ताब्यात घेऊन तो माजी कर्णधार सुनील गावसकर यांना देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

Advertisement
Topics mentioned in this article