1 month ago

लंडन येथील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालय येथून भारतात आणलेली वाघनखे आणि सोबतच शिवशस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे. नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात  ऐतिहासिक वाघनखे आणि विशेष आकर्षणासह शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाच्या दालनाचे उद्घाटन दुपारी साडे बारा वाजता पार पडेल..

Feb 07, 2025 21:53 (IST)

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या काकांच्या कारचा अपघात

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या काकांच्या कारचा अपघात झाला आहे. ओमराजे निंबाळकर यांचे काका बाबा पाटील यांची इनोव्हा कार पीक अप ला धडकली त्यामुळे हा अपघात झाला. कारच्या एअर बॅग उघडल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.  

Feb 07, 2025 19:36 (IST)

11 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत होणार सन्मान

11 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत होणार सन्मान होणार आहे. शरद पवार यांच्या हस्ते शिंदे यांचा हा सन्मान होणार आहे.  एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्काराने सन्मानित केले जाईल. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि मंत्री मुरलीधर मोहोळ हे या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहेत. 

Feb 07, 2025 18:44 (IST)

शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक

शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण  आणि हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आला आहे. आरोपी सूरज धोडीला गुजरात मधून अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी सूरज धोडीला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक धोडी अपहरण  आणि हत्या प्रकरणी आतापर्यंत 5 आरोपी अटक करण्यात आले आहे. तर अद्याप मुख्य आरोपी अविनाश धोडी सह 3 आरोपी फरार आहेत.

Feb 07, 2025 18:40 (IST)

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी आंदोलन पुकारणार

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी आंदोलन पुकारणार आहेत. अंतरवाली सराटीत उपोषणस्थळी पुन्हा मंडप टाकण्याचं काम सुरु झालं आहे. जरांगे यांच्या उपोषण स्थगित करण्याच्या घोषणेनंतर हा मंडप काढण्यात आला होता. जरांगे यांच्याकडून पुन्हा आमरण उपोषण किंवा साखळी उपोषणाची घोषणा होण्याची शक्यता आहे.  उद्या सकाळी 10 वाजता जरांगे घेणार पत्रकार परिषद घेणार आहेत. 

Advertisement
Feb 07, 2025 14:01 (IST)

मुंबईत गुईलेन बॅरे सिंड्रोमचा (GBS) संशयित रुग्ण आढळला

मुंबईत गुईलेन बॅरे सिंड्रोमचा (GBS) संशयित रुग्ण आढळला, अंधेरीतील सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये असलेला रुग्ण जीबीएस संशयित, पुढील चाचणी सुरु असल्याची मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती

Feb 07, 2025 12:56 (IST)

एसटी महामंडळावर सेठी यांची नियुक्ती तात्पुरती : प्रताप सरनाईक

एसटी महामंडळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती ही तात्पुरती असून लवकरच तिथे एखाद्या राजकीय व्यक्तीला जबाबदारी देण्यात येईल. हे फक्त एक महामंडळ असून महामंडळाच्या अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतला, तरी शेवटी या खात्याचा मंत्री म्हणून अंतिम निर्णय मीच घेत असतो, अशी स्पष्टोक्ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 

Advertisement
Feb 07, 2025 11:42 (IST)

नाशिकच्या नामवंत बिल्डरच्या घरावर पहाटेच्या सुमारास गोळीबार आणि दगडफेक

नाशिकच्या दिंडोरी रोडवरील नामवंत बिल्डरच्या घरावर पहाटेच्या सुमारास गोळीबार आणि दगडफेक. अज्ञात दोघांनी घरावर गोळीबार करून पळ काढला. दोन दिवसांपूर्वीच घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाचीही तोडफोड. हल्ल्यांमागील कारण अद्याप स्पष्ट नाही.  घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर. म्हसरूळ पोलीस स्टेशनकडून पुढील तपास सुरू आहे. 

Feb 07, 2025 11:11 (IST)

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला धक्का, 9 नगरसेवक शिंदे गटात

उद्धव ठाकरे गटाला  छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा झटका, संभाजीनगर शहरातील माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 9 नगरसेवक उद्धव ठाकरेंचे साथ सोडणार, किशोर नागरे, स्वाती नागरे,मोहन मेघावले , रूपचंद वाघमारे,अनिल जैस्वाल , हिमा खरात ,मकरंद कुलकर्णी यांचा आज होणार पक्षप्रवेश

Advertisement
Feb 07, 2025 11:09 (IST)

महाकुंभमेळ्या पुन्हा आगीची घटना, सेक्टर 18 मध्ये लागली आग

प्रयागराज : महाकुंभमेळ्या पुन्हा आगीची घटना, सेक्टर 18 मध्ये लागली आग लागली, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Feb 07, 2025 10:34 (IST)

"राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणार", समरजीत घाटगेंची NDTV मराठीला माहिती

विधानसभा निवडणुकीनंतर कागल मतदारसंघातील उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे यांच्या भूमिकेकडं लक्ष आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घाटगे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र समरजित घाटगे यांनी असा कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती एनडीटीव्ही मराठीला दिली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबतच्या लढतीमध्ये घाटगेंना पराभव झाला होता. 

Feb 07, 2025 08:48 (IST)

तुरीच्या दरात मोठी घसरण, हमीभावापेक्षा 500 रुपये कमी दराने विक्री

वाशिम जिल्ह्यात मागील महिनाभरापासून नवीन तूर बाजारात दाखल होत आहे. मात्र, शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसून, हमीभावापेक्षा तब्बल ५०० रुपये कमी दराने तुरीची विक्री होत आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.

शासनाने २०२४-२५ या वर्षासाठी तुरीसाठी ७५५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, सध्या बाजार समित्यांमध्ये तुरीला सरासरी ७ हजार रुपयांपेक्षाही कमी दर मिळत आहे. काही बाजारांमध्ये कमाल ७२७० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असला, तरी बहुतांश ठिकाणी हमीभावापेक्षा कमी दरानेच व्यवहार होत आहेत.

जवळपास दोन महिन्यांपूर्वी तुरीला ११ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत होता. मात्र, हंगाम सुरू होताच दर घसरले. यामुळे मोठ्या खर्चाने तूर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

Feb 07, 2025 08:39 (IST)

पुणेकरांसाठी मिळकत करामध्ये दिलासा, करात वाढ न करण्याचा निर्णय

पुणेकरांसाठी मिळकत करामध्ये दिलासा मिळाला आहे.  पुणे महापालिकेचा मिळकत करात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.  पुणे महापालिकेने सलग नवव्या वर्षी मिळकत करात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६च्या अर्थसंकल्पात करा मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नसून, जुने दर जैसे थे असणार आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मिळकत कर विभागाकडून कोणतीही करवाढ न करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला होता.

Feb 07, 2025 08:34 (IST)

लातूर जिल्ह्यातील हमीभाव केंद्र रात्री 12 वाजता बंद; शेतकऱ्यांकडून पोर्टल सुरू करण्याची मागणी

लातूर जिल्ह्यात 52 हमीभाव केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी केली जात होती. मुदत संपल्याने रात्री उशिरा पोर्टल बंद झाल्याने शेतकऱ्यांची सोयाबीनची खरेदी थांबवण्यात आली आहे. गेल्या चार ते पाच दिवसापासून शेतकरी हमीभाव खरेदी केंद्राच्या बाहेर सोयाबीन विक्रीसाठी प्रतीक्षेत होते. त्याची मुदत संपल्याने शेतकऱ्यांना हताश होऊन परत जावं लागलं. दरम्यान अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आज लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन जळून आंदोलन करण्याचं इशारा देण्यात आला आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून आणि छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Feb 07, 2025 08:32 (IST)

जळगाव शहरातील नवी पेठ भागात लिफ्ट कोसळून व्यावसायिकाचा मृत्यू

जळगाव शहरातील नवी पेठ भागात लिफ्टची टेस्टिंग करत असताना वायर तुटून लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेत व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. राजकुमार दर्डा असे व्यावसायिकाचे नाव असून सायकल व्यवसायाच्या तीन मजली इमारतीत राजकुमार दर्डा यांनी लिफ्ट बसवली होती. या लिफ्टची टेस्टिंग सुरू असतानाच अचानक लिफ्टची वायर तुटून तिसऱ्या मजलावरून लिफ्ट कोसळल्याने राजकुमार दर्डा हे गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Feb 07, 2025 08:29 (IST)

पुणे-नाशिक महामार्गावर खासागी बस-कंटेनरमध्ये धडक, 40 ते 50 प्रवासी जखमी

पुण्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे पुणे-नाशिक महामार्गावर खासागी प्रवासी वाहतूक करणारी लक्झरी बस व कंटेनरमध्ये भीषण अपघात. अपघातामध्ये बसमधील 40 ते 50 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुण्याकडे जात असलेल्या बसने पुढे चाललेल्या कंटेनरला मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Topics mentioned in this article