विना HSRP वाहनांची आता खैर नाही! RTO कडून किती दंड आकारला जाणार?

महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी परिवहन विभागाने एक अत्यंत महत्त्वाची आणि कडक नियमावली जाहीर केली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत 30 जून रोजी संपली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकट करण्यासाठी आणि बनावट नंबर प्लेट्सच्या वापराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वाहनांवर हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत 30 जून रोजी संपत असून, 1 जुलैपासून राज्यभरात वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाकडून (RTO) संयुक्तपणे विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात येत आहे. ज्या वाहनांवर क्रोमियम होलोग्राम असलेली ही विशेष नंबर प्लेट नसेल, त्यांना थेट 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

हा नियम प्रामुख्याने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना लागू आहे. अनेकदा मुदतवाढ देऊनही राज्यातील तब्बल 2.1 कोटी पात्र वाहनांपैकी केवळ 1.08 कोटी वाहनांनाच आतापर्यंत HSRP प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. अजूनही 1 कोटीहून अधिक वाहने या कक्षेबाहेर असल्याने शासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचे पैसे या तारखेला खात्यात जमा होणार, कृषिमंत्र्यांची विधानसभेत घोषणा)

नियम न पाळल्यास अनेक सुविधा बंद होणार

जर तुमच्या वाहनाला 1 जुलैपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवलेली नसेल, तर केवळ रस्त्यावरच दंड होणार नाही, तर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) खालील महत्त्वाच्या कामांवर बंदी आणली जाईल.

  • वाहनाचे हस्तांतरण
  • पत्ता बदलणे
  • हायपोथेकेशन चढवणे किंवा उतरवणे 
  • वाहनाची पुनर्नोंदणी 
  • वाहनाच्या तपशीलात बदल करणे
  • परवाना व परमिट नूतनीकरण

व्यावसायिक वाहनांच्या सुरक्षेचा आणि निकषांचा विचार करता, सध्यातरी वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाला या नियमातून तात्पुरती सूट देण्यात आली आहे.

(नक्की वाचा-  Pune Lohagad Case: सियाने लग्नाच्या शॉपिंगसाठी केतनकडून उकळली मोठी रक्कम; एवढ्या पैशांचं काय केलं?)

अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना तात्पुरता दिलासा

ज्या वाहनचालकांनी  30 जून रोजी किंवा त्यापूर्वीच अधिकृत पोर्टलवरून ऑनलाइन फी भरून HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आपली वेळ आरक्षित केली आहे, त्यांना या दंडात्मक कारवाईतून तात्पुरती सवलत देण्यात आली आहे. त्यांच्या अनुसूचित तारखेपर्यंत त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. मात्र, ज्यांनी अद्याप नोंदणीच केलेली नाही, त्यांना थेट कारवाईला सामोरे जावे लागेल.

Topics mentioned in this article