Political News: राज्यात राजकीय भूकंप होणार? एकनाथ शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर'; ठाकरेंच्या 8 खासदारांची गुप्त बैठक?

Political News: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत उद्धव ठाकरे गटाचे 8 खासदार फोडण्याची तयारी केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Political News: महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय डाव टाकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेंनी ठाकरे गटाच्या 8 खासदारांसोबत एक अत्यंत गुप्त बैठक घेतली असून, याला 'ऑपरेशन टायगर' असे नाव देण्यात आले आहे. या घडामोडींमुळे महाविकास आघाडीत आणि विशेषतः शिवसेना ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाने मात्र या सर्व चर्चांचं खंडन केलं आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी तर पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडणार नाही, असं लिहून दिलं. 

ठाण्यातील 'ती' गुप्त बैठक

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, याबाबतची महत्त्वाची बैठक ठाण्यात पार पडली. या बैठकीचे तपशील अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले होते. ठाकरे गटाचे 6 खासदार या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी झाले होते. उर्वरित 2 खासदारांनी व्हिडिओ कॉलद्वारे शिंदेंशी संवाद साधल्याचे समजते. या गुप्त बैठकीनंतर एकनाथ शिंदे तातडीने आपल्या मूळ गावी, सातारा जिल्ह्यातील दरे येथे मुक्कामासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यालाही राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Ladki Bahin Yojna: "...तर 'लाडकी बहीण' योजना बंद करा," हायकोर्टाने राज्य सरकारला झापले)

गुप्त बैठकीत कोण-कोण सहभागी? 

  • अरविंद सावंत
  • संजय पाटील
  • संजय देशमुख
  • नागेश पाटील
  • भाऊसाहेब वाकचौरे
  • ओम राजेनिंबाळकर
  • राजाभाऊ वाजे
  • संजय जाधव

वरील खासदार ठाण्यात पार पडलेल्या बैठकीत सहभागी असल्याचा दावा केला जात आहे. 

वृत्तानुसार या खासदारांनी शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे. जर हे 8 खासदार फुटले, तर संसदेत आणि राज्यात ठाकरे गटाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. यापूर्वीही शिंदेंनी 40 आमदारांसह उठाव केला होता.  मात्र आता खासदारांच्या कथित बैठकीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. 

(नक्की वाचा-  Pune Railway News: पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मांजरी स्टेशनचा कायापालट तर रामटेकडीला मिळणार नवे स्टेशन)

बातम्या पेरल्या जात आहेत- संजय राऊत

सध्या अशा बातम्या पेरल्या जात आहेत. अशा बातम्या चुकीच्या आहेत. खासदारांना काही अडचणी आहेत, हे नक्की. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विकासनिधी दिले जात नाहीत. लाखो लोकांनी निवडून दिलेल्या खासदारांना निधी दिले जात नाही. तुमच्या बापाच्या खिशातले पैसे आहेत का?  असा संतप्त सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. 
 

पाहा VIDEO

Topics mentioned in this article