Maharashtra Rain Alert : राज्यातील 6 जिल्ह्यांना आज 'ऑरेंज अलर्ट', मुंबई पुण्यात कशी असेल स्थिती?

Rain Alert Imd Forecast : तर कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथ, सांगली, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे येथे विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

IMD Forecast : मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस राज्यात पुन्हा सक्रीय होणार आहे. येत्या 5 दिवसांसाठी राज्यासाठी हवामान विभागाने तीव्र हवामानाचा इशारा दिला आहे. आजपासून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई आणि पुण्यात कसा असेल पाऊस?

हवामान खात्याच्या मते, 12 जूनपासून 14 जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यात 12 जूनसाठी रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. 

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, जळगाव, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी विजाच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.  

( नक्की वाचा : Raja Raghuvanshi Murder : राजाच्या हत्येनंतर सोनमनं 17 दिवस काय केलं? वाचा Inside Story )

ऑरेंज अलर्ट

तर कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथ, सांगली, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे येथे विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Advertisement
Topics mentioned in this article