Holiday News: 7 फेब्रुवारीला राज्यात सुट्टी जाहीर, कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?

Holiday News: उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ही सुट्टी केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नाही. तर खाजगी कंपन्या, आयटी (IT) पार्क्स, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स आणि रिटेलर्सना ही सुट्टी देणे बंधनकारक आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Holiday News: राज्यात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य सरकारने संबंधित 12 जिल्ह्यांमध्ये 'भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. सुरुवातीला हे मतदान 5 फेब्रुवारीला होणार होते, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शासकीय दुखवट्यामुळे निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख पुढे ढकलली आहे.

सुट्टी लागू असलेले 12 जिल्हे

  • कोकण विभाग- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
  • पश्चिम महाराष्ट्र- पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
  • मराठवाडा- छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव, लातूर.

(नक्की वाचा-  Pune News : फक्त दंड नाही तर गाडीच जप्त होणार, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात पुणे पोलीस आक्रमक)

खासगी कंपन्या आणि आयटी पार्क्ससाठी कडक नियम

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ही सुट्टी केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नाही. तर खाजगी कंपन्या, आयटी (IT) पार्क्स, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स आणि रिटेलर्सना ही सुट्टी देणे बंधनकारक आहे. जे मतदार आपल्या कामाच्या ठिकाणापासून दूर असलेल्या निवडणूक क्षेत्रात राहतात, त्यांनाही ही भरपगारी सुट्टी मिळणे त्यांचा हक्क आहे. जिथे पूर्ण दिवस सुट्टी देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही, तिथे कर्मचाऱ्यांना मतदानासाठी कमीतकमी 2 ते 3 तासांची सवलत देणे अनिवार्य आहे.

(नक्की वाचा-  Pankaja Munde: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड! लातूर दौरा रखडला)

नियम मोडल्यास कडक कारवाई

जर एखाद्या आस्थापनेने मतदानासाठी सुट्टी नाकारली किंवा कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली, तर त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. कामगारांनी अशा तक्रारी जिल्हा कामगार कार्यालयात नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 

Topics mentioned in this article