Mumbai News: नागरिकांच्या जीवाशी खेळ; फळांना उंदीर मारायचं औषध लावणाऱ्या फळविक्रेत्याचा VIDEO व्हायरल

Mumbai News: मालाडमध्ये एका फळ विक्रेत्याने फळांना उंदरांपासून वाचवण्यासाठी 'Ratol' हे विषारी औषध लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे मुंबईकरांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबईच्या मालाड परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि भीतीदायक प्रकार उघडकीस आला आहे. आपले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी एका फळ विक्रेत्याने थेट ग्राहकांच्या जीवाचा सौदा केला आहे. उंदरांनी फळे खाऊ नयेत, यासाठी हा विक्रेता काही फळांवर 'Ratol' (उंदीर मारण्याची क्रीम) लावत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्याच्या बेजबाबदारपणावर आता संतापाची लाट उसळली आहे.

'Ratol' वापरणे किती घातक?

'Ratol' सारख्या विषारी पदार्थांमध्ये घातक रसायने असतात, जी मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत.  ही फळे खाल्ल्यास उलटी होणे, तीव्र पोटदुखी आणि अन्नातून विषबाधा होऊ शकते. यातील रसायनांमुळे लिव्हर (यकृत) निकामी होण्याचा किंवा गंभीर इजा पोहोचण्याचा धोका असतो. लहान मुले किंवा वृद्धांच्या बाबतीत हा प्रकार जीवघेणा ठरू शकतो.

(नक्की वाचा-  Dombivli News: 10 बिअर, 45 झोपेच्या गोळ्या खाल्ल्या; नर्सने बोलणे बंद केल्याने डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न)

फळ विक्रेत्याचा अजब आणि क्रूर तर्क

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विक्रेता परप्रांतीय असून तो उंदरांचा त्रास टाळण्यासाठी हा मार्ग अवलंबत होता. फळांच्या आवरणाला हे औषध लावल्यामुळे उंदीर फळांकडे फिरकत नाहीत. मात्र ग्राहकाने ही फळे खरेदी करताना किंवा धुताना निष्काळजीपणा दाखवला, तर त्याचे थेट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. फळविक्रेची ही कृती स्थानिकांना पकडली आणि आपला संताप व्यक्त केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मालाडमधील सजग नागरिकांनी या विक्रेत्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.