Malegaon Bomb Blast: मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपींची सुटका कशी झाली? कोर्टाने निकालात काय म्हटलं?

29 सप्टेंबर 2008 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे, अंजुमन चौकाजवळील भिकू चौकात एका मोटरसायकलवर बांधलेल्या स्फोटकामुळे जोरदार स्फोट झाला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

Malegaon bomb Blast Case Verdict : मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणी 17 वर्षांनंतर कोर्टाने निकाल दिला आहे. एनआयए कोर्टाने पुरव्यांअभावी सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी अशी या सात जणांचा समावेश आहे.

29 सप्टेंबर 2008 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे, अंजुमन चौकाजवळील भिकू चौकात एका मोटरसायकलवर बांधलेल्या स्फोटकामुळे जोरदार स्फोट झाला. हा स्फोट रमजान महिन्यात आणि नवरात्रीच्या आधी घडला, ज्यामुळे सांप्रदायिक तणाव निर्माण झाला होता. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आणि 100 हून अधिक लोक जखमी झाले होते.

(नक्की वाचा-  Malegaon Bomb Blast Case: मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरण! सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता)

निकालात नेमकं काय?

न्यायाधीशांनी नमूद केले की, स्फोटासाठी वापरलेल्या मोटरसायकलचा चेसिस नंबर मिटवण्यात आला होता. इंजिन नंबरवरही शंका आहे. विशेष म्हणजे, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या त्या बाईकच्या मालक होत्या किंवा ती बाईक त्यांच्या ताब्यात होती, हे दर्शवणारे कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

(नक्की वाचा- Malegaon bomb blast: 1 केस, 17 वर्ष 7 आरोपी, मालेगाव स्फोटाची भीषण स्टोरी

लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि आरडीएक्सचा मुद्दा

याच प्रकरणात आरोपी असलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर आरडीएक्स आणल्याचा आणि वापरल्याचा आरोप असला तरी, त्यांच्या घरात आरडीएक्स साठवल्याचा कोणताही पुरावा नाही. तसेच त्यांनी ते एकत्र केले होते, हे सिद्ध करणारेही कोणतेही पुरावे नाहीत, असेही न्यायाधीशांनी आपल्या निरीक्षणात म्हटले आहे.

Advertisement

कोर्टाने आधी लावलेला मकोका नंतर रद्द केला त्यामुळे याकाळात घेतलेल्या साक्षही निरर्थक आहेत.  UAPA साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची आहे. त्यामुळे UAPA लागू होत नाही. केवळ संशयाच्या आधारे या आरोपींना दोषी ठरवता येत नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे. 

Topics mentioned in this article