Mumbai Video : घाटकोपरनंतर मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर संतापजनक घटना, तरुणाला रंगेहाथ पकडलं

मुंबईच्या मरिन ड्राईव्हचा एक संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका तरुणाने मुलींचे व्हिडीओ आणि फोटो गुपचूप काढले अन् त्यानंतर असं काही घडलं..

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Marine Drive Video
मुंबई:

Marine Drive Video Viral : बुरखा घातलेला एक तरुण मुंबई लोकल ट्रेनच्या चक्क लेडीज डब्ब्यात घुसल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची तातडीनं दखल घेत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे. या घटनेमुळं महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच मुंबईच्या मरिन ड्राईव्हमध्येही एका व्यक्तीने विचित्र प्रकार केल्याचं समोर आलं आहे. विकृती मानसिकता असणारे लोक भररस्त्यात महिलांची छेड काढून त्यांचा विनयभंगही करतात. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशातच मरिन ड्राईव्हचा एक संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

मरिन ड्राईव्हवर नेमकं काय घडलं?

एक व्यक्तीने मरिन ड्राईव्हवर मुलीचं गुपचूप फोटो आणि व्हिडीओ काढले.डिजिटल क्रिएटर मृणाल नावाच्या यूजरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत पाहू शकता, तरुणी त्या व्यक्तीला थेट विचारते की, तू अशाप्रकारचे फोटो काढतोस? माझे पण काढ..आणखी दुसऱ्या कोणाचे फोटो काढ..आम्ही फिरायचंच नाही का? मृणालने त्या व्यक्तीला चांगलच सुनावलं आणि म्हणाली, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात..तुमचं वय काय..? 

नक्की वाचा >> Ajit Pawar Death : 'पायलटने Mayday कॉल दिला नाही,त्याला टेकऑफ नंतर..', विमान अपघाताचा नवा ट्वीस्ट समोर

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ

मृणालने कॅप्शनमध्ये म्हटलंय, तो व्यक्ती मुलींचे अश्लील फोटो काढत होता,याची माहिती तिला एका अनोळखी व्यक्तीने दिली होती. त्यानंतर मृणालने या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश झाला. मृणालने या गंभीर प्रकरणाला वाचा फोडल्यानं सोशल मीडियावर तिचं कौतुक केलं जात आहे. व्हिडीओ व्हायरल होताच एका यूजरने म्हटलंय,आम्हाला तुझा अभिमान आहे. अन्य एका यूजरने म्हटलंय की, रागाच्या भरात त्याच्या फोन फोडायचा की..

Advertisement