NDTV Emerging Business Conclave: "कबुतर आणि लोकांचं आरोग्य याचा समातोल राखला पाहिजे" : मंगलप्रभात लोढा

मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, सहा 'न्यू एज कोर्सेस' तयार करण्यात आले आहेत, ज्याला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय, शॉर्ट टर्म कोर्सेसही सुरू करण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

NDTV Emerging Business Conclave Mumbai Chapter : एनडीटीव्ही मराठीच्या 'इमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्ह' या कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नवीन सरकार आल्यापासून तरुणांसाठी सुरू केलेल्या महत्त्वाच्या योजनांबद्दल माहिती दिली. मंगल प्रभात लोढा यांनी कबुतरखान्यावरुन सुरु असलेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोढा यांनी म्हटलं की, "कबुतर आणि लोकांचं आरोग्य असा दोन्ही बाजूने विचार करणे गरजेचं आहे. कबुतरखान्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. तर लोकांच्या आरोग्याचा विचार करून दोन्ही गोष्टींचा समतोल साधून निर्णय घेतला पाहिजे."

(नक्की वाचा - Emerging Business Conclave : 'तुम्ही काय केलं, ठाकरे बंधूंना सवाल'; शेलारांनी 1995 पासून कामाचा पाढाच वाचला)

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, नवीन सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नवीन योजनांची माहिती देताना मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं की, सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) खासगी संस्थांसोबत भागीदारीसाठी एक योजना सुरू केली आहे. यात संबंधित संस्थेने 30% गुंतवणूक करावी लागेल, तर 70% गुंतवणूक सरकार करेल. या योजनेत मालमत्ता सरकारचीच राहील आणि खासगी भागीदारांना 10 वर्षांसाठी ती चालवण्याची परवानगी दिली जाईल.

सर्व आयटीआयमध्ये रिकाम्या जागांवर नवीन हँगर उभारण्यात आले आहेत. यामध्ये एसी क्लासरूम्स, वर्कशॉप्स आणि टीचर्स रूम्स तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत झाली आहे. पुढे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, सहा 'न्यू एज कोर्सेस' तयार करण्यात आले आहेत, ज्याला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय, शॉर्ट टर्म कोर्सेसही सुरू करण्यात आले आहेत.

(नक्की वाचा-  Emerging Business Conclave : मराठीचं शिक्षण देणाऱ्या APP ची निर्मिती करणार; भाषा वादावर उदय सामंतांचा उपाय)

मुंबईतील विद्याविहार येथी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कील ॲकॅडमी यशस्वीपणे सुरू असून, तिथे केवळ परदेशी भाषाच नाही, तर परदेशी संस्कृतीही शिकवली जात आहे. तिथे नोकरीच्या संधींसह सर्व काम सुरु आहे. तिथे फार यश मिळालं नसलं क्लासेस सुरु आहे.

Advertisement