मनोज जरांगे आज काय भूमिका घेणार?, सरकारला दिलेला अल्टिमेटमही आज संपणार

Manoj Jarange In Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरच्या सिडको चौक ते क्रांती चौक अशी रॅली काढली जाणार आहे. त्यानंतर क्रांती चौकात जरांगे यांची जाहीर सभा होणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपत आहे. मराठा आरक्षणच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठवाड्यात शांतता रॅली काढण्यात आली आहे. हिंगोलीपासून सुरुवात झालेल्या या शांतता रॅलीचा आज संभाजीनगरमध्ये समारोप होत आहे. 

संभाजीनगरच्या सिडको चौक ते क्रांती चौक अशी रॅली काढली जाणार आहे. त्यानंतर क्रांती चौकात जरांगे यांची जाहीर सभा होणार आहे. जरांगे यांच्या या शांतता रॅलीला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाजीनगर शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरातील 750 शाळा, 107 कॉलेजसह शेकडो खाजगी आस्थापन बंद राहणार आहे. तसेच शहरातील काही मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर सकाळी 9 वाजेपासून सभा संपेपर्यंत केम्ब्रिज चौक ते नगर नाक्यापर्यंत वाहतूक बंद रहाणार आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कशी आहे मनोज जरांगे रॅलीची तयारी?

  • शहरातील चौकांत चहा-नाश्त्याची सोय
  • रॅलीच्या मार्गावर 250 भोंगे
  • रॅलीसाठी 500 स्वयंसेवकांची नियुक्ती
  • रॅलीसाठी 5 हजार झेंडे तयार
  • शहरात ठिकठिकाणी 800 बॅनर 
  • वेगवेगळ्या 13 ठिकाणी स्वागतासाठी कमानी
  • एकूण 5 ठिकाणी एलईडी
  • 10 बलून हवेत सोडले जाणार 
  • रॅलीदरम्यान 10 रुग्णवाहिका तैनात राहणार 
  • 10 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम

रॅलीसाठी पोलीस बंदोबस्त कसा असेल?

  • 1 पोलीस आयुक्त
  • 3 पोलीस उपायुक्त
  • 5 सहायक पोलीस आयुक्त
  • 29 पोलीस निरीक्षक
  • 3 हजार पोलीस कर्मचारी,अधिकारी

( नक्की वाचा : Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं पावणेपाच वर्षांनी कमबॅक, विधानपरिषद निवडणुकीत दणदणीत विजय )

मनोज जरांगे यांच्या रॅलीचा असा असेल कार्यक्रम?

  • आंतरवाली सराटी येथून 10 वाजता जरांगे छत्रपती संभाजीनगरकडे निघतील.
  • चिकलठाणा येथे 11.30 वाजेच्या सुमारास जरांगे यांचे आगमन होईल. तेथे त्यांचे स्वागत केले जाणार.
  • सिडकोतील वसंतराव नाईक चौकात माजी मुख्यमंत्री नाईक यांच्या पुतळ्यास जरांगे पुष्पहार अर्पण करतील 
  • हायकोर्ट वकिलांतर्फे जरांगेंचं स्वागत करण्यात येणार
  • आकाशवाणी चौकात मुस्लिम समाजातर्फे स्वागत केले जाणार
  • अमरप्रीत चौकात बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यास जरांगे पुष्पहार अर्पण करतील. 
  • अमरप्रीत चौकातचं 10 जेसीबीतून प्रत्येकी एक क्विंटल याप्रमाणे 10 क्विंटल फुलांची उधळण जरांगे यांच्यावर केली जाणार आहे.
  • क्रांती चौकात जरांगेंचं विविध समाजबांधवांतर्फे स्वागत केले जाईल. 
  • दुपारी 3.30च्या सुमारास 11 मुलींच्या हस्ते जरांगे यांचे औक्षण केले जाईल.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादनानंतर सभेला सुरुवात होईल.

कोणते रस्ते बंद राहणार?

  • केम्ब्रिज चौक ते नगर नाका चौक
  • कोकणवाडी चौक ते सिल्लेखाना चौक

पर्यायी मार्ग

  • केंब्रिज चौक, झाल्टा फाटा ते बीड बायपास रोडने महानुभव आश्रम चौक या मार्गाने जातील व येतील.
  • केंद्रीज चौक ते सावंगी बायपास, हसुल टी, हडको कॉर्नर, अण्णाभाऊ साठे चौक, सिटी क्लब, मिलकॉर्नर, महावीर चांक (बाबा पेट्रोलपंप) या मार्गाने जातील व येतील.
  • नगरनाका, लोखंडी पुल, पंचवटी, रेल्वेस्टेशन मार्गे महानुभव चौक या मार्गाने जातील व येतील.
  • सोलापुर- धुळे या राष्ट्रीय महामार्गने जातील व येतील.
  • कोकणवाडी चोक, पंचवटी चांक, महावीर चौक मार्गे पुढे जातील व येतील.
  • शहरातील नागरिक जालना रोड ऐवजी शहरातील इतर पर्यायी मार्गाचा वापर करतील.

( नक्की वाचा : Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं पावणेपाच वर्षांनी कमबॅक, विधानपरिषद निवडणुकीत दणदणीत विजय )

मनोज जरांगे रॅलीसाठी पार्किंग व्यवस्था

  • जालना,करमाडकडून येणाऱ्या वाहनांसाठी पार्कीग रामनगर कमानीसमोर ग्रॅमफोर्थ समोरील पार्किंग.
  • सिल्लोड,फुलंब्रीकडून येणाऱ्या वाहनांसाठी पार्कींग शरद टी सिग्नल जवळ खुले मैदान, आंबेडकर चौक पिसादेवी रोड वरील राममंदिर ट्रस्ट मैदान, मिलीनियम पार्क समोरील मैदान.
  • कन्नड,वैजापुर,नगर रोडकडुन येणाऱ्या वाहनांसाठी पार्कीग आयकर भवन जवळील फुटबॉल मैदान, कर्णपुरा पार्कीग, अयोध्या मैदान.
  • पाचोड,अडुळकडुन येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग जीबींदा मैदान.
  • बिडकिन,पैठणकडून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग अयोध्या मैदान.