अवैधरित्या सावकारीचा धंदा करणाऱ्या नागपूरच्या सागर दोशीचे एका मागोमाग एक कारनामे समोर येत आहे. त्याने ज्या पद्धतीने पिडीतांकडून कर्जाची वसूली केली आहे ते ऐकल्यानंतर अंगाचा थरकाप उडतो. अंगावर काटा येतो. वसूली करण्यासाठी इतकी क्रुर पावलं तो कसा काय उचलू शकतो असा प्रश्नही निर्माण होत आहे. शिवाय गृहमंत्र्यांच्याच शहरात अशा पद्धतीची वसूली लूट सुरू असताना त्याच्या विरोधात कारवाई होण्यास इतका विलंब होते हे ही तितकेच गंभीर आहे. याच क्रुर सावकाराची एक एक प्रकरणे आता पुढे आली आहेत. ती ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सागर दोशी या विरोधात नागपूरात आता चार तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. तो व्हिटॅमिन एम ही संस्था काढली होती. या द्वारे तो लोकांना कर्ज देत. शिवाय आपण चार्टर्ड अकाऊंटंट असल्याचेही खोटे सांगत. कर्ज दिल्यानंतर त्याची प्रति महिना दहा टक्के व्याज, त्यावर चक्रवाढ व्याज, महिन्याची व्याज परताव्याची तारीख चुकली की पेनल्टी अशा पद्धतीने तो वसूली करत असे. बरं तो येवढ्यावर थांबत नव्हता. त्यानंतर तो पिडीत लोकांना धाक दाखवत असे. त्यातून तो दुप्पट, तिप्पट किंवा चक्क चारपट वसूली सुद्ध करत असल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग बातमी - तो भिंतीवरून आला, तिला गच्चीवर घेवून गेला, हातपाय बांधले अन् पुढे...
मनोज नायडे... हे नागपूरातील धंतोली येथील टिकेकर रोडवर राहतात. त्यांनीही सागर दोशीकडून 13 लाखाचे कर्ज घेतले होते. हे कर्ज घेणे त्यांना परवडले नाही. त्याचा पश्चाताप ते आज ही करत आहेत. त्यांनी कर्ज घेतल्यानंतर व्याजासह त्याला नगदी आणि चेक द्वारे साडे सव्वीस लाख रूपये परत दिले होते. त्यानंतरही त्याची भूक काही थांबली नाही. सागर याने त्यांची शेती ज्याची किंमत जवळपास 25 ते 30 लाख आहे. त्याचेही त्याने जबरदस्ती करून विक्री पत्र लिहून घेतले. त्यानंतर त्यांच्या राहत्या घरावरही त्याने दावा केला. पैसे फिटले नाहीत असे सांगितले. त्या बंगल्याची किंमत जवळपास 15 कोटी आहे. या बंगल्यासाठी त्याने तगादा लावला होता. त्यासाठी तो कधीही घरी यायचा. धमकवायचा. घरात सर्वच जण जेष्ठ नागरीक होते. त्यामुळे त्याच्या धमक्यांना सर्व जण घाबरायचे. त्या भीतीनेच त्यांच्या आईचाही मृत्यू झाल्याचे नायडू सांगतात. शेवटी त्यांनी पोलिसात धाव घेतली. आपल्या सोबत काय झाले आहे याचा पाठ वाचला.
ट्रेंडिंग बातमी - 'लाडकी बहीण'नंतर आता 'लाडकी मोलकरीण' योजना; शिंदे सरकार मोठ्या घोषणेच्या तयारीत?
नायडू यांच्या प्रमाणे खांडेकर कुटुंबा बरोबरही तेच घडलं. सागरने त्यांनाही सोडलं नाही. नागपुरच्या बेसा परिसरात व्यंकटेश सिटी फेज दोनमध्ये जयश्री खांडेकर आपल्या कुटुंबा सोबत राहतात. त्यांचे पती संजय खांडेकर सांगतात की, “मी 4 लाख रुपये घेतले होते. त्यातील 2 लाख रुपये परत केले, त्या नंतर त्याने धमक्या देऊन, माझ्यावर दबाव टाकून 25 लाख रुपयांचे दुकान लिहून घेतले . मग मला वाटलं आता तरी मुक्ती मिळाली. पण परत त्याने आणखी रक्कम काढून माझा राहता फ्लॅट लिहून घेतला आणि मग आम्हाला बाहेर काढण्याचे प्रयत्न करू लागला..” एकदा अर्ध्या रात्री चक्क त्यांचे हात धरून त्यांच्या मुलासह त्यांना राहत्या घरा बाहेर काढले होते. त्यानंतर फोनाफोनी केली तेव्हा कुठे तो तिथून निघून गेला.
ट्रेंडिंग बातमी - बांगलादेशातील हिंसाचार, भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशींची टरकली
मध्य रात्री एका महिलेला आणि तिच्या मुलाशी अभद्र वागणूक केल्याची तक्रार होती. पोलिसांनी तक्रार घेतली पण गुन्हा दाखल केला नाही. या संपूर्ण प्रकरणाची दहशत इतकी जास्त होती की त्यांनी त्यांचा मुलगा पुन्हा फ्लॅट बाहेर पडायला दीड महिने घाबरत होते. या पीडितांच्या आधीच्या तक्रारींवर नागपूर पोलिसांनी कारवाई केली नव्हती, मात्र नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांनी स्वतः पुढाकार घेऊन या तक्रारींची दखल घेतल्यावर चार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. आरोपी व्हिटॅमिन एम म्हणजेच सागर दोशी याला अटक देखील झाली आहे. आता नागपूर पोलिस आयुक्तांच्या पुढाकाराने एक आशेचा किरण दिसू लागला आहे. या पीडितांना त्यांची गमावलेली प्रॉपर्टी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 अंतर्गत परत मिळण्याची अपेक्षा पल्लवित झाली आहे.