स्वातंत्र्यदिनी धारावीतील विद्यार्थ्यांनी रंगवलं धारावीचं भविष्यचित्र! ‘मेरे सपनो की धारावी' उपक्रम चर्चेत

भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन धारावीत शनिवारी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा झाला.परिसरातील 40 हून अधिक शाळांमधील 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ‘मेरे सपनो की धारावी '2.०'या उपक्रमाअंतर्गत आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

जाहिरात
Read Time: 4 mins
Adani Group Dharavi Project latest News
मुंबई:

Adani Dharavi Project Latest News : भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन धारावीत शनिवारी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा झाला.परिसरातील 40 हून अधिक शाळांमधील 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ‘मेरे सपनो की धारावी '2.०'या उपक्रमाअंतर्गत आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या उपक्रमाचे आयोजन अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने (एएनडीपीएल)केले.धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एएनडीपीएल ही विशेष उद्देश कंपनी (SPV) स्थापण्यात आली आहे.धारावी सोशल मिशन (DSM) यांचाही उपक्रमात सहभाग होता.

दैनंदिन जीवनातील अनेक संकल्पना विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयांच्या केंद्रस्थानी होत्या.हरितपट्टे,स्वच्छ परिसर,स्वच्छ ऊर्जा, जलसंवर्धन,कचरा व्यवस्थापन,आरोग्य,शिक्षण,तंत्रज्ञान या विषयांवर रेखाचित्रे,रंगचित्रे,मॉडेल्स,वैज्ञानिक प्रकल्पाच्या माध्यमातून हे विद्यार्थी व्यक्त झाले आणि उपस्थित नागरिक तसेच परीक्षकांची दाद मिळवून गेले.यंदाच्या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य होते,ते म्हणजे विज्ञान प्रदर्शन.कलाविष्काराला नवोन्मेष आणि विज्ञानाविष्काराची जोड ‘मेरे सपनो की धारावी' उपक्रमाला निराळा आयाम प्राप्त करणारी ठरली. 

Advertisement

केवळ समस्याच नव्हे,तर त्यांचे निराकरण सादर करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या माध्यमातून केला.‘मेरे सपनो की धारावी' उपक्रमाची सुरुवात जानेवारी 2025 मध्ये झाली.त्यावेळी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून प्रेरणा घेऊन यंदा चित्रकला स्पर्धेबरोबर विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. सर्जनशीलतेला वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड मिळाल्यामुळे समस्यांच्या मांडणीबरोबरच व्यवहार्य तोडगा शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त केले गेले.जवळपास 10 लाख रहिवासी असलेल्या धारावीचा कायापालट मुंबईतील सर्वांत लक्षणीय नागरी परिवर्तन घडवणारा ठरेल.

स्वयंपूर्ण वसाहत निर्मिती हा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा उद्देश

एक एकात्मिक, सुनियोजित, स्वयंपूर्ण वसाहत निर्मिती हा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा उद्देश आहे.यानिमित्ताने राहणीमान आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवताना रहिवाशांना विपुल संधीही उपलब्ध केल्या जात आहेत.यावेळी नेहरू निज्ञान केंद्राचे संचालक आणि ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ अरविंद परांजपे उपस्थित होते.ते म्हणाले,"या विद्यार्थांनी प्रत्येक आव्हानावर उपाय शोधण्याचा प्रयत्न ज्या प्रकारे केला,तो प्रेरणादायी आहे.पाणी,कचरा,ऊर्जा या विषयांवर त्यांनी सादर केलेले प्रकल्प जिज्ञासू वृत्ती,निरीक्षणशक्ती आणि चौकटीपलीकडे विचार करण्याची त्यांची क्षमता दर्शवणारे ठरतात.युवा पिढीला घडवण्यासाठी असा वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो".

प्रसिद्ध कलाकार आणि अॅनिमेटर धिमंत व्यास म्हणाले,"या मुलांचा अस्सलपणा आणि आशावाद मला खूप भावला.शाश्वत, लोकाभिमुख आणि संधींनी युक्त अशा धारावीचे संकल्पनाचित्र त्यांनी कला आणि नवोन्मेषातून साकारले.आजूबाजूचा परिसर कसा हवा याची अभिव्यक्ती सर्जकतेतून मांडता येते हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले". मूळच्या धारावीच्या प्रसिद्ध कलाकार वंदना कोरी म्हणाल्या,"धारावीचे भविष्य सादर करताना विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या आत्मविश्वासाचे आणि अभिमानाचे एक धारावीकर म्हणून मला कौतुक वाटते.भविष्यातील धारावीविषयी त्यांची आशा कलाकृती आणि प्रकल्पांमधून व्यक्त होते.हे करताना धारावीची ओळख त्यांनी कुठे मिटू दिलेली नाही.‘मेरे सपनो की धारावी'सारखे उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांची भूमिका मांडण्याची संधी देतात आणि धारावीचे भवितव्य घडवताना येथील मुलांचा आवाजही मोलाचा ठरेल हे सुनिश्चित करतात".

चित्रकला स्पर्धा विजेती यशिका कोरी (मॉर्निंग स्टार इंग्लिश स्कूल)-"भविष्यातील धारावी मला मांडायची होती.जिथे खूप झाडे असतील, बागा असतील. मुलांना खेळण्यासाठी जागा असतील.येथील रहिवासी परस्परांसमवेत रमू शकतील अशी चांगली घरे दाखवण्याचाही माझा प्रयत्न होता".विज्ञान प्रदर्शन विजेता शेख अली (बी.एस.आय.ए.एस इंग्लिश हाय स्कूल) -"आजूबाजूच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी विज्ञानाचा वापर कसा करावा याचा विचार करण्याची संधी मिळाली.धारावीला स्वच्छ बनवतानाच पाणी आणि ऊर्जेचा जपून विनियोग कसा करावा याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी केला".  

Advertisement

‘मेरे सपनो की धारावी' उपक्रमाची सर्वत्र होतेय चर्चा

‘मेरे सपनो की धारावी' हा उपक्रम 2025 पासून विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी देत आहे.आपले घर,आपला परिसर,आपली धारावी कशी असावी हे त्यांच्या नजरेतून,कल्पनेतून मांडले जात आहे.साध्या,सरळ आशावादाचा वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आविष्कार यंदा चित्रकला स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने पाहावयास मिळाला.या संकल्पनेतून खेळण्यासाठी आणि शिकण्यासाठी अधिक मोकळ्या जागा,अधिक स्वच्छ परिसर,अधिक उत्तम पायाभूत सुविधा,कुटुंबांसाठी अधिक संधी अशा विषयांचे प्रकटीकरण झाले. भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनी ‘मेरे सपनो की धारावी 2.० उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नजरेतून,कल्पनाशक्तीतून धारावीची झलक पाहावयास मिळाली.आशियातील सर्वांत मोठ्या बिगरनियोजित वसाहतीची अधिक सुरक्षित आणि आशादायी भविष्याकडे वाटचाल कशी सुरू आहे,हेही यातून प्रतिबिंबित झाले.   

अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एएनडीपीएल) ही धारावी पुनर्विकास प्रकल्पाची (धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट - डीआरपी) अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एक विशेष उद्देश कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल -एस.पी.व्ही) आहे. या एस.पी.व्ही.मध्ये महाराष्ट्र शासन आणि अदाणी समूह हे भागधारक आहेत.धारावीकरांच्या जीवनमानात सुधारणा करणे,पायाभूत सुविधा बळकट करणे आणि एकूणच जीवनाची गुणवत्ता उंचावणे या उद्देशाने एएनडीपीएलची स्थापना करण्यात आली आहे. 

Advertisement

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे.एएनडीपीएलच्या माध्यमातून दर्जेदार गृहनिर्माणासोबतच वाहतूक जोडणी,पाणीपुरवठा,वीज,स्वच्छता व्यवस्था तसेच डिजिटल सेवा यांसारख्या अत्यावश्यक नागरी सुविधा एकत्रित करून आधुनिक,सुरक्षित आणि समावेशक नागरी वसाहती विकसित करण्यात येणार आहेत.या पुनर्विकास प्रक्रियेत भौतिक पायाभूत सुविधांइतकेच समुदायाचे सर्वांगीण कल्याण,स्थानिक उद्योजकता आणि उपजीविका टिकविणे यांनाही समान महत्त्व देण्यात आले आहे.एएनडीपीएलची पुनर्विकास संकल्पना महाराष्ट्र शासनाच्या निर्धारित नियमांनुसार तसेच जागतिक दर्जाच्या सर्वोत्तम पद्धतींवर आधारित असून,शाश्वत,समावेशक आणि भविष्यासाठी सज्ज अशा नागरी पर्यावरणाची निर्मिती करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.