Mhada Lottery 2024 : म्हाडाची सर्वात स्वस्त घरं कुठल्या भागात? कधीपर्यंत अर्ज करता येईल? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करणारी म्हाडाच्या लॉटरीचे (Mhada Lottery) महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करणारी म्हाडाच्या लॉटरीचे (Mhada Lottery) महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत. मुंबईत म्हाडाच्या घराच्या किंमती 10 ते 25% स्वस्त झाल्या आहे. याआधी म्हाडाच्या वाढलेल्या किमती पाहून सर्वसामान्यांना तोंडात बोटं घालावी लागली होती. त्यानंतर यात बदल करण्यात आला आहे. 

मध्यम, उच्च गटासोबतच अल्प, अत्यल्प गटातील घरांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. विक्रोळी, बोरिवली, सांताक्रूझ, मुलुंड, माझगाव, ओशिवरातल्या घरांच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. याशिवाय चेंबूर, भायखळा, गोरेगाव, वडाळा, दादर, घाटकोपर, कांदिवलीतल्या घरांच्या किंमतीतही कपात केली आहे. 2030 घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली असून त्यात खासगी विकासकांच्या 370 सदनिकांचा समावेश आहे. म्हाडाच्या ह्या घरांच्या किंमती 70 लाख ते साडेसात कोटीपर्यंत आहेत. मात्र किंमती प्रचंड असल्यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं चित्र होतं. ग्राहकांच्या थंड प्रतिसादानंतर किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि घरांच्या किमती कमी करण्यात आल्या. या प्रकारानंतर अर्ज करण्याची मुदत आता 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. 

Advertisement

खासगी विकासकांनी बांधल्यामुळे या घरांच्या किंमती जास्त होत्या. एकूण 2030 घरांपैकी 370 घरांच्या किंमती कमी करण्यात आलेल्या आहेत. 33/5 आणि 33/7 अंतर्गत म्हाडाला प्राप्त झालेल्या घरांच्या किमती कमी केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हाडाच्या काही निवडक घरांमधील EWS घरांची किंमत 25 % ने कमी होणार आहे, LIG घरांची किंमत 20 % ने कमी होणार आहे तर MIG घरांची किंमत 15% ने कमी होणार आहे. याशिवाय HIG घरांची किंमत 10 % ने कमी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Advertisement

नक्की वाचा - तब्बल 10 लाख प्रत्यक्ष रोजगार, केंद्राचा नवा प्रकल्प; महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी बातमी

अर्ज नोंदणी करण्यासाठी इथं क्लिक करा - https://housing.mhada.gov.in

किमती नेमक्या कशा कमी होणार
उत्पन्न गट           प्रमाण
अत्यल्प             25%
अल्प                 20%
मध्यम               15%
उच्च                 10%

Advertisement
Topics mentioned in this article