जाहिरात

MHADA News: म्हाडा कोकण मंडळाची स्वस्तातली घरं, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत वाढ

कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे.

MHADA News: म्हाडा कोकण मंडळाची स्वस्तातली घरं, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत वाढ
मुंबई:

म्हाडा कोकण मंडळाच्या सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही घरे ठाणे शहर, जिल्हा आणि वसईमध्ये मोक्याची ठिकाणी आहेत. शिवाय त्यांचे दर ही अतिशय कमी आहेत. जवळपास 5,285 घरांसाठी ही सोडत असणार आहे. त्याच बरोबर ओरोस सिंधुदुर्ग, कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरिता आयोजित सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला 12 सप्टेंबर 2025 पर्यंत दुसर्‍यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अनामत रकमेसह प्राप्त पात्र अर्जांची सोडत आता  09 ऑक्टोबर 2025 रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
           
या सोडतीसाठी 28 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत 1,49,948 अर्ज प्राप्त झाले होते. अनामत रकमेसह 1,16,583 अर्ज प्राप्त झाले आहेत. नवीन वेळापत्रकानुसार सदर सोडतीसाठी 12 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत आहे. दिनांक 13 सप्टेंबर 2025 रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करता येणार आहे. दिनांक 15 सप्टेंबर 2025 रात्री 11.59 वाजेपर्यंत आरटीजीएस/एनईएफटीद्वारे अर्जदारांना बँकेत अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे.

नक्की वाचा - Manoj Jarange Patil Maratha Morcha LIVE: मनोज जरांगे पाटील आज मुंबईत पोंहचण्याची शक्यता कमी

सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी 22 सप्टेंबर, 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता 'म्हाडा'च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 9 ऑक्टोबर 2025 रोजी सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.           

कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 565 सदनिका, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002 सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहेत, त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत 1677 सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (50 टक्के परवडणार्‍या सदनिका) 41 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत 77 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

नक्की वाचा - Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय म्हणाले? जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मोठी प्रतिक्रिया

15 जुलै 2025 रोजी 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. मंडळातर्फे पहिल्यांदा  28 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करण्यास अर्जदारांना मुदतवाढ देण्यात आली होती. सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणार्‍या अडचणीचे निराकरण करण्यासाठी मंडळातर्फे 022 -69468100 हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोडतीसाठी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्जदारांनी अर्ज करावा, असे आवाहन कोकण मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com