Mumbai MHADA : बाबो! इतक्या कोटींना आहे म्हाडाचं सर्वात महागडं घर; कुठे आहे हा फ्लॅट? काय आहे खासियत?

MHADA's most expensive flat in Mumbai : मुंबई लॉटरीअंतर्गत सर्वात स्वस्त घरं ३१ लाखांपासून सुरू झालं असून सर्वात महाग घर ८ कोटींपर्यंत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

MHADA's most expensive flat in Mumbai : महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) च्या मुंबई बोर्डाकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या मुंबई बोर्डाने लॉटरीसाठी ३,५५० घरांची निवड केली आहे. ही घरं गोरेगाव, विक्रोळी कन्नमवार नगर, प्रतीक्षा नगर, मानखुर्द, पवई, वडाळा, अंधेरी, ताडदेव या भागात आहेत. याअंतर्गत सर्वाधिक महागड्या  घराची किंमत पाहून अनेकांना धक्काच बसला. 

म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई बोर्डाची लॉटरी मार्च-एप्रिलमध्ये जारी करण्यात येईल. सर्वाधिक २,९५० घरं गोरेगावच्या पत्राचाळीत आहे, तर तब्बल ६०० घरं विक्रोळी-कन्नमवार नगर आणि प्रतीक्षा नगरमध्ये उपलब्ध असतील. 

बांधकाम शेवटच्या टप्प्यात...

गोरेगावच्या २,९५० घरांपैकी २५० घरं उच्च उत्पन्न गटात, १,७०० मध्यम उत्पन्न गटासाठी आणि १,००० कमी उत्पन्न गटासाठी आहेत. विक्रोळीच्या ६०० घरांमधील बहुतेक घरं मध्यम उत्पन्न गटासाठी आहेत. या घरांचं बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. मुंबई बोर्डाची शेवटची लॉटरी २०२४ मध्ये काढण्यात आली होती.

नक्की वाचा - Pune News: पुण्यात मोक्याच्या ठिकाणी 4186 घरं, म्हाडाच्या सोडतीची तारीख झाली जाहीर

१.२९ लाख लोकांनी केली नोंदणी...

२,०३० घरांसाठी १.२९ लाख लोकांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. तर २०२३ मध्ये ४,०८२ घरांसाठी १.०९ लाख अर्ज आले होते. घरांची संख्या कमी असल्याने अर्जदारांना मोठी प्रतीक्षा करावी लागली. म्हाडा लॉटरी प्रक्रियेची तयारी जलद मार्गाने करीत आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

Advertisement

मुंबईत MHADA च्या लॉटरीत कुठल्या भागात किती फ्लॅट? 

  • तुंगा, पवई - ४२ फ्लॅट
  • अँटॉप हिल, वडाळा - २७ फ्लॅट
  • जेव्हीपीडी, अंधेरी पश्चिम - ७ फ्लॅट
  • ताडदेव - ६ फ्लॅट
  • लोअर परेल - ४ फ्लॅट
  • भायखळा - ६ फ्लॅट
  • कांदिवली (शिंपोली/चारकोप) - ९ फ्लॅट


म्हाडा मुंबई २०२६ च्या फ्लॅटच्या किमती...

  • या योजनेचे सर्वात मोठं आकर्षण म्हणजे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅट मिळतील. 
  • सर्वात परवडणारी घरं मानखुर्द (पीएमजीपी) येथे आहेत. ज्यांची सुरुवातीची किंमत सुमारे ३१ लाख आहे.
  • मध्यम आणि प्रीमियम: अंधेरी पश्चिम (जेव्हीपीडी), पवई (तुंगा), वडाळा (अँटॉप हिल) आणि लोअर परळ यासारख्या लोकप्रिय भागात फ्लॅट उपलब्ध आहेत.
  • लक्झरी विभाग: उच्च उत्पन्न असलेल्या खरेदीदारांसाठी, सर्वात महागडा फ्लॅट ताडदेवमधील क्रेसेंट टॉवरमध्ये आहे, ज्याची किंमत सुमारे ८ कोटी आहे.
  • इतर प्रमुख क्षेत्रांमध्ये कांदिवली (शिंपोली आणि चारकोप), घाटकोपर पूर्व, विक्रोळी (कन्नमवार नगर) आणि भायखळा यांचा समावेश आहे.


८ कोटींचा सर्वात महागडा फ्लॅट...

ताडदेवमधील क्रेसेंट टॉवरमध्ये म्हाडाचा सर्वात महागडा फ्लॅट उपलब्ध असेल. याची किंमत तब्बल ८ कोटी आहे. या फ्लॅटचा Built-up area १,८३८ चौरस फूट असून कार्पेट एरिया १,५३२ चौरस फूट आहे.