Pune News: पुरंदरच्या जेजुरीत मन सुन्न करणारी घटना! सेफ्टी टँकमधील पाण्यात बुडबुडे दिसताच अख्ख कुटुंब हादरलं

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दवणेमळा परिसरात राहणाऱ्या एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Jejuri Child Death News

देवा राखुंडे, प्रतिनिधी

Pune Jejuri Viral News :  पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दवणेमळा परिसरात राहणाऱ्या एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला.सेफ्टी टँकमध्ये पडून या चिमुरड्याचा जीव गेल्याची माहिती समोर आलीय.शिव अविनाश हितापूर असं मृत मुलाचं नाव आहे.ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

कुटुंबीय,शेजाऱ्यांनी परिसरात शोध घेतला, पण..

मिळालेल्या माहितीनुसार,शिव सकाळी साडेअकराच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाला.कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी परिसरात शोध घेतला. परंतु, त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही. अखेर कुटुंबियांनी जेजुरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम राबवली. शोधमोहीम सुरू असताना घराजवळील सेफ्टी टँकमधील पाण्यात बुडबुडे दिसल्याने संशय आला.

Advertisement

नक्की वाचा >> Akola News: अकोल्यात बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त, तिघांना अटक, 500 रुपयांच्या किती नोटा सापडल्या?

टँकमधील पाणी बाहेर काढलं, त्यानंतर सगळ्यांना धक्काच बसला

टँकमधील पाणी बाहेर काढल्यानंतर शिव त्या टाकीत पडल्याचं समोर आलं. त्यानंतर शिवला तातडीने जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जेजुरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

नक्की वाचा >> Miss World स्पर्धेत पाकिस्तानची पहिल्यांदाच एन्ट्री, अनिका जमालने सोशल मीडियावर मार्केट केलंय जाम, पाहा Photos