Mira Road News : शाळेसमोरच सुरू होतं संतापजनक कृत्य; मिरा रोडच्या पोलिसांकडून मोठा पर्दाफाश

धक्कादायक म्हणजे ज्या स्पा सेंटरवर ही कारवाई करण्यात आली ते शहरातील आरबीके शाळेसमोरच असल्याने शैक्षणिक संस्थेजवळ अशा प्रकारचे कथित अवैध प्रकार सुरू असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

इरफान सय्यद, प्रतिनिधी

Mira-Bhayandar News : मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा टाकून स्पाच्या आड सुरू असलेल्या कथित देहव्यापाराचा पर्दाफाश केला. या कारवाईत पाच तरुणींची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

स्पा सेंटरच्या आडून देहव्यापार....

पोलिसांना बेव्हर्ली पार्क रोड, आरबीके स्कूलसमोरील A.N.K. Luxury Salon & Spa येथे स्पाच्या नावाखाली कथित देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे यांच्या पथकाने स्पा सेंटरवर छापा टाकला. कारवाईदरम्यान स्पा सेंटरमधून ५ तरुणींची सुटका करण्यात आली. स्पाच्या आड कथित देहव्यापार चालविल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

नक्की वाचा - पुण्यात पोलिसांनीच टाकला दरोडा? नवले पुलावर 1 कोटी रुपये लुबाडण्यासाठी काय घडलं?

धक्कादायक म्हणजे ज्या स्पा सेंटरवर ही कारवाई करण्यात आली ते शहरातील आरबीके शाळेसमोरच असल्याने शैक्षणिक संस्थेजवळ अशा प्रकारचे कथित अवैध प्रकार सुरू असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला असून स्पा सेंटरचा परवाना, कागदपत्रे आणि या व्यवसायाशी संबंधित इतर बाबींचीही चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आढळल्यास त्यांनाही अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


 


Topics mentioned in this article