'ती' जादू पुन्हा दाखवा अन्यथा.. कल्याणमधील पाणी प्रश्नावर मनसेचा इशारा

Kalyan Water Issue : पावसाचा जोर सध्या सगळीकडं वाढतोय. पण, ऐन पावसाळ्यातही कल्याण ग्रामीणमधील पाणी प्रश्न ज्वलंत आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान, प्रतिनिधी

पावसाचा जोर सध्या सगळीकडं वाढतोय. पण, ऐन पावसाळ्यातही कल्याण ग्रामीणमधील पाणी प्रश्न ज्वलंत आहे. या प्रश्नानवर मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांसोबत बैठक घेतली. लोकसभा निवडणूकीच्या दोन महिने आधी जादू दाखवून पाणी पुरवठा करण्यात आला.तशीच जादू आत्ता दाखवा. पाण्याच्याबाबतीमध्ये एमआयडीसी चालूगिरी करीत आहे.पाणी प्रश्न सुटला नाही तर एमआयडीसीवर विशाल मोर्चा काढू असा  इशारा राजू पाटील यांनी दिला आहे. 

कल्याण ग्रामीणमधील अनेक भागात पाणी टंचाई आहे. एकीकडे मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी आहे. तर काही भागात पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. चार दिवसापूर्वी एमआयडीसी निवासी भागातील नागरीकांनी पाणी प्रश्नावर डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात मुलांसोबत ठिय्या मांडला होता. अनंत रिजेन्सी या बड्या गृहसंकलतील नागरीकांना पाणी मिळत नसल्याने नागरीकांनी  बिल्डरच्या कार्यालयात गोंधळ घातला. त्यावेळी त्यांचा बाऊन्सरसोबत वाद झाला.

( नक्की वाचा : मुंबईकरांना सल्ला, कोकणात अलर्ट, राज्यभरातील पावसाबाबत मुख्यंत्र्यांकडून महत्त्वाचे अपडेट )
 

मनसे आमदार राजू पाटील यांनी सोमवारी केडीएमसी आयुक्त इंदूराणी जाखड यांच्यासोबत तातडीची बैठक घेतली. लवकरात लवकर ही समस्या सूटली पाहिजे अशी सूचना आयुक्ताना दिली. नेतिवली, पिसवली, दावडी, डोंबिवली जिमखाना या भागाला सातत्यानं पाणी टंचाई सहन करावी लागत आहे.  काही लोक उपोषणाला बसले. काहींनी मोर्चे काढले.आमचे एकच सांगणे होते. लोकसभा निवडणूका लागण्याच्या दोन महिने आधी  जादू केली होत, तीच जादू करा.त्या पद्धतीने पाणी आले तरी चालेल. 

पाण्याचा प्रश्न टप्प्या टप्प्याने सोडविण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं आहे. आम्ही त्यांना आठ दिवसाचा वेळ दिला आहे. या कालवाधीमध्ये परिस्थिती सुधारली नाही तर एमआयडीसीवर मोर्चा काढणार आहे, असा इशारा पाटील यांनी दिला. 

Advertisement
Topics mentioned in this article