गणेशोत्सव ऐन रंगात आला आहे. दिड दिवसाच्या गणपतीनंतर गौरी गपणतीचे पाच दिवसानंतर विसर्जनही झाले आहे. अकरा दिवसांचा गणेशोत्सव अजूनही मोठ्या उत्सहात संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जात आहे. काही ठिकाणचे देखावे तर सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. कुणे समाज प्रबोधनपर तर कुठे निसर्गाचा मुक्त वापर केलेले देखावे दिसत आहे. पण कळंबोलीतील मनसेच्या कार्यकर्त्याने त्याच्या घरात साकारलेला देखावा सध्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. या कार्यकर्त्याने आपल्या घरात चक्क शिवतिर्थ साकारलं आहे.
या कार्यकर्त्याचं नाव आहे स्वप्नील घाडगे. स्वप्नील मनसेचा कळंबोली शाखा प्रमुख आहे. तो मनसेचा कट्टर समर्थक समजला जातो. त्याच्या घरी यावर्षीही गणेशाचं आगमन झालं. त्या वेळपासूनच काही तरी वेगळा देखावा करण्याचं त्याच्या मनात होतं. त्यातूनच त्याने शिवतिर्थ आणि त्यावर होणारी राज ठाकरेंची सभा असा देखावा साकार केला. त्या शिवतिर्थ दाखवण्यात आलं आहे. त्यात राज ठाकरे भाषण करताना दिसत आहेत.
शिवाय राज यांच्या सोबत व्यासपीठावर मनसेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी ही दिसत आहे. स्वप्नील यांनी त्यांचा हा देखावा त्यांच्या इंस्टा अकाऊंटवर ही टाकला आहे. त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय मनसैनिकांनी त्यावर खास कमेंटही केला आहे. सालाबादप्रमाणे माझ्या घरी यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने माझे आदरणीय श्रद्धास्थान व मार्गदर्शक राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क सभेचा जीवंत देखावा रेखाटण्याचा छोटासा प्रयत्न केल्याचं स्वप्नील सांगतो.
नक्की वाचा: राज्यात कामगारांचे कामाचे तास 9 वरुन 12 तासांपर्यंत; सरकारचा मोठा निर्णय
हा देखावा पाहण्यासाठी मनसैनिकांनी त्याच्या घरी गर्दी केल्याचं चित्र होतं. शिवाय स्थानिक रहिवाशांनीही हा देखावा पाहिला. पनवेल महापालिकेत वेगवेगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही देखावे उभारले आहेत. तिथेही स्थानिकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचे चित्र पहायला मिळत आहेत. नागरिक गणेश दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतानाही दिसत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांसाठी हा गणेशोत्सव महत्वाचा समजला जात आहे.