भारताला मंकीपॉक्सचा धोका, केंद्र सरकार अलर्ट मोडवर

केंद्राने सर्व राज्य सरकारांना त्यांच्या राज्यातील रुग्णालयांमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांसाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. 

Advertisement
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

काही दिवसांपूर्वी आफ्रिकेकडील देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले होते. ज्यानंतर 14 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला आपत्कालीन घोषित करण्यात आले आहे. 

WHOने दिलेल्या माहितीनुसार, 2022 नंतर 116 देशांमध्ये मंकीपॉक्सचे 99,176 रुग्ण समोर आले होते. ज्यात 208 जणांचा मृत्यू झाला होता. भारतातही मंकीपॉक्सचे 30 रुग्ण सापडले होते. 2024 मार्चमध्ये याचा शेवटचा रुग्ण सापडला होता. मंकीपॉक्स आजाराचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलं आहे.

पाकिस्तान, बांगलादेशच्या सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला असून देशातील सर्व बंदरे, विमानतळांवर ही अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये मंकीपॉक्सच्या लक्षणांबाबत सतर्क राहण्याच्या दिल्या सूचना केली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिल्लीतील राम मनोहर लोहिया, सफदरजंग आणि लेडी हार्डिंज या तीन मोठ्या केंद्रीय रुग्णालयांमध्ये नोडल सेंटर तयार केली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - 'केवळ राखीच्या भरवशावर राहू नका'; राखीपौर्णिमेनिमित्ताने डॉ. ताईचा समस्त महिलावर्गाला संदेश

मंकिपॉक्स रुग्णांवर उपचार आणि काळजी घेण्यासाठी या रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेत. केंद्राने सर्व राज्य सरकारांना त्यांच्या राज्यातील रुग्णालयांमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांसाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. भारतात अद्याप मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही पण खबरदारी म्हणून केंद्र सरकारने सर्व तयारी केली आहे.