महाराष्ट्रातील मान्सूनबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याची माहिती पुणे वेधशाळेकडून देण्यात आली आहे. (Return journey of Monsoon)
बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बुधवार ते शनिवारपर्यंत राज्यभरात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे. बंगालच्या उपसागरावरून काही प्रमाणात (Maharashtra Rain Update) बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे हवेच्या वरच्या स्तरात कोरड्या उष्ण वाऱ्याची आणि बाष्पयुक्त वाऱ्याची घुसळण होऊन विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
नक्की वाचा - एकच शाळा, एकच दोर, एकच खांब; प्रेमाचं असं वेड की युगुलाने एकत्रच संपवली जीवनयात्रा
बंगालच्या उपसागरावरुन बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे कोरड्या उष्ण वाऱ्याची आणि बाष्पयुक्त वाऱ्याची घुसळण होत असल्याने विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्य महाराष्ट्रात मात्र काही ठिकाणी 9 ते 13 ऑक्टोबरदरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.