जाहिरात

STने सवलतीत प्रवास करायचाय? लगेच काढा NCMC स्मार्ट कार्ड! कसे, कुठे, किती दिवसांत मिळणार कार्ड? वाचा सविस्तर

MSRTC NCMC Smart Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) 1 ऑगस्ट 2026 पासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक केले आहे. हे कार्ड कसे काढायचे?संपूर्ण माहिती येथे वाचा.

STने सवलतीत प्रवास करायचाय? लगेच काढा NCMC स्मार्ट कार्ड! कसे, कुठे, किती दिवसांत मिळणार कार्ड? वाचा सविस्तर
"MSRTC NCMC Smart Card: एसटीचे NCMC स्मार्ट कसे काढायचे?"

MSRTC NCMC Smart Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी सेवा अधिक पारदर्शक तसेच डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 'एनसीएमसी स्मार्ट कार्ड' बंधनकारक केले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनुसार, शासकीय सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी हे कार्ड आवश्यक असून त्याशिवाय पूर्ण भाडे आकारले जाईल. यासाठी राज्यात 4 हजारांहून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहेत. एसटीचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड कसे काढावे, कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत,  याबाबत माहिती जाणून घेऊया...

STचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड कसे काढावे?

सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक

  • नोंदणी आणि वितरण केंद्र
  • एसटी बस डेपो/ नियंत्रण केंद्र
  • अधिकृत एजंट

आवश्यक कागदपत्रे 

  • महिला - आधार कार्ड
  • ज्येष्ठ नागरिक - आधार कार्ड
  • विद्यार्थी - सरल क्रमांक 
  • दिव्यांग - वैध ओळखपत्र 

कार्ड शुल्क : नवीन स्मार्ट कार्ड 199 रुपये 

कार्ड वितरण : नोंदणीनंतर 30 दिवसांत

महत्त्वाच्या सूचना

  • सवलतीसाठी RuPay ON-THE-GO (NCMC) स्मार्ट कार्ड आवश्यक
  • कार्ड नसल्यास पूर्ण भाडे आकारले जाईल
  • कार्ड वॉलेटमधून सवलतीचे तिकीट दिले जाईल
  • वॉलेट कॅश किंवा UPIने टॉपअप करता येईल. 

 

1 ऑगस्टपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात 4 हजारांहून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत.

(नक्की वाचा : 'या' तारखेपासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक, मेट्रो, रेल्वे, बससह इतर वाहतुकीसाठीही फायदेशीर)

दरम्यान, स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांचा वितरण परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे.

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ सुरळीतपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावे, या उद्देशाने स्मार्ट कार्ड प्रणाली राबविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी 1 ऑगस्टपूर्वी आपले स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com