Vasai News: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! मुंबई-अहमदाबाद हायवेवर 6 वाहनांची विचित्र कोलांटउडी, 'ही' चूक भोवली?

Mumbai Ahmedabad Highway Accident: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत धडकी भरवणारी बातमी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Ahmedabad Highway Accident : या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे.
वसई:

Mumbai Ahmedabad Highway Accident: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत धडकी भरवणारी बातमी आहे. वसई तालुक्याच्या हद्दीत एकापाठोपाठ एक सहा वाहने एकमेकांना धडकली. यावेळी एका टेम्पोमध्ये चालक पूर्णपणे अडकून पडला होता, त्याला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले.

ससुपाडा परिसरात काँक्रीटचे काम सुरू असताना हा अपघात घडला. यामध्ये दोन कार, एक बस, टेम्पो, कंटेनर आणि एका पिकअप व्हॅनचा समावेश आहे. या सहाही वाहनांची धडक इतकी जोरात होती की वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, टेम्पोमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिक नागरिक आणि वसई वाहतूक पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Advertisement

ब्लॅक स्पॉट ठरतोय जीवघेणा

हा अपघात घडण्यामागे रस्ते प्राधिकरणाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. ससुपाडा येथील सर्विस रोडचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. अर्धवट राहिलेले काँक्रिटीकरण आणि रस्त्यावरील धोकादायक वळणे (ब्लॅक स्पॉट) यामुळे इथे वारंवार अपघात होत आहेत. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवून रस्ता मोकळा केला.

( नक्की वाचा : KDMC News: कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा दिलासा! पालिका बजेटमध्ये करवाढ शून्य; पाहा तुमच्या शहरासाठी काय आहे खास )

NHAI विरोधात संताप

या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर (NHAI) कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. वारंवार सूचना देऊनही आणि अपघात होऊनही रस्ते प्राधिकरण गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता तरी NHAI ने आपली जबाबदारी स्वीकारावी आणि अपूर्ण कामे पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

( नक्की वाचा : Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा हायवेवर आता ट्रॅफिक विसरा! 1 जूनला काय घडणार? वाचा सविस्तर )

प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.