Mumbai Bank: लाडक्या बहिणींना 0% व्याजदराने कर्ज वाटप होणार, 'या' तारखेला मुंबई बँक देणार कर्ज

जेव्हा ही योजना घोषीत झाली त्यावेळी त्याबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना मुंबई बँक आणखी एक गिफ्ट देणार आहे. या लाडक्या बहीणींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी 0% टक्के व्याजदराने कर्ज देणार आहे. या कर्ज वितरणाचा उद्घाटन सोहळा  बुधवारी 3 सप्टेंबरला होणार आहे.  विधान परिषदेतले भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. या योजनेमुळे महिलांना बीन व्याजी कर्ज मिळणार आहे. शिवाय त्या आपला उद्योग व्यवसाय सुरळीत सुरू करू शकणार आहेत. 

नक्की वाचा - Mumbai Maratha Reservation Protest: CSMT स्टेशनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना काढा, हायकोर्टाचे निर्देश

मुंबई बँकेने हा उपक्रम राबवला आहे. महिलांना 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज या योजनेत मिळणार आहे. एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळीले. त्यात 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात. त्याच थेट फायदा त्या महिलांना मिळणार आहे. मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी व्यवसायाच्या तपासणी केली जाईल असं दरेकर यांनी सांगितलं होतं. व्याजाचा परतावा आम्ही महामंडळाकडून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत असं ही स्पष्ट केलं. ते महिलांना देण्याची गरज नसेल.  

Manoj Jarange Patil Mumbai Maratha Protest: महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन, राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल

जेव्हा ही योजना घोषीत झाली त्यावेळी त्याबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली होती. शिवाय या योजनेचा लाभ कुठल्या महिलांना मिळणार याची विचारणा होत होती. त्यानुसार सध्या तरी या योजनेचा लाभ हा मुंबईतील महिलांना घेता येणार आहे. त्यामध्ये जवळपास मुंबईत 12 ते 13 लाख लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी आहेत अशी आकडेवारी समोर आली आहे.  तर 1 लाखांच्या आसपास लाडक्या बहीणी या मुंबई बँकेच्याच सभासद आहेत, अशी माहितीही प्रविण  दरेकर यांनी दिली आहे. या योजनेचा शुभारंभ आता तीन सप्टेंबरला होत आहे.