Vande Bharat: मुंबई-बेंगळुरू दरम्यान आता स्लीपर 'वंदे भारत'! रेल्वेमंत्र्यांची मंजुरी, पुणेकरांना ही फायदा

प्रवाशांना झोपण्यासाठी विशेष एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले बर्थ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ज्यामुळे रात्रभराचा प्रवास थकवा विरहित होईल.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते केएसआर बेंगळुरू दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यास मंजुरी
  • वंदे भारत स्लीपर ट्रेन १३ तासांत मुंबई ते बेंगळुरूचा प्रवास पूर्ण करणार असून प्रवाशांचा वेळ ५ तास वाचेल
  • या ट्रेनमध्ये १६ डबे असून ८२३ प्रवाशांची क्षमता असून आरामदायी बर्थ आणि आधुनिक शौचालयांची सोय असेल
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई- पुणे:

अजिंक्य धायगुडे पाटील

मुंबई ते बेंगळुरू या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर आता प्रवाशांना प्रीमियम प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते केएसआर बेंगळुरू दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. बेंगळुरूचे खासदार पी.सी. मोहन यांनी सोशल मीडियावर रेल्वेमंत्र्यांच्या पत्राची प्रत शेअर करत ही माहिती दिली आहे. देशातली ही दुसरी स्लीपर वंदे भारत ट्रेन असणार आहे. याचा फायदा पुणेकराना ही होणार आहे. प्रवासाचा वेळी ही वाचणार आहे. 

रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गासाठी दोन रेल्वे गाड्या (Rakes) दिल्या जाण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई आणि बेंगळुरू या दोन्ही शहरांतून दररोज रात्री ही सेवा उपलब्ध होऊ शकेल. सध्या या मार्गावर 'उद्यान एक्सप्रेस' ही एकमेव दैनंदिन गाडी आहे या ट्रेनला बंगळुरूला पोहचण्यासाठी 21 ते 23 तास लागतात. दुसरी ट्रेन  कोईमतुर एक्सप्रेस आहे. ही पुणे मार्गे जाते. तिला पोहोचण्यासाठी ल 19 तास 20 मिनिटे लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेस 13 तासात बंगळूरु गाठणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत 5 तास अधिक बचत होणार आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Video: जे कोणालाही जमलं नाही ते महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीमुळे जमलं, मोदी- गांधी आले एकत्र, चर्चा काय?

आधुनिक सोयीसुविधा हे वंदे भारतचे वैशिष्ट्य आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन 180 किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे. यामध्ये 16 आधुनिक डबे असून एकूण 823 प्रवाशांची क्षमता असेल. आरामदायी बर्थ, आधुनिक शौचालये आणि प्रगत निर्जंतुकीकरण तंत्रज्ञान ही या गाडीची वैशिष्ट्ये आहेत. रात्रभर प्रवास आणि सकाळी पोहोचणार अशी स्थिती आहे. मुंबई आणि बेंगळुरू या दोन आयटी आणि व्यावसायिक शहरांना जोडणारी पहिली 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन लवकरच रुळावर येण्याची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 5 एप्रिल रोजी या प्रस्तावाला हिरवा कंदिल दाखवला आहे.

नक्की वाचा - Pune News: पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला मारहाण, Video होतोय Viral

सध्या मुंबई-बेंगळुरू प्रवासासाठी 'उद्यान एक्सप्रेस' हा एकमेव रोजचा पर्याय आहे. मात्र, या प्रवासाला जवळपास 22 तास लागतात. वंदे भारत स्लीपरमुळे प्रवाशांचा वेळ तर वाचणारच आहे, पण हा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. हा मार्ग देशातील दुसरा वंदे भारत स्लीपर कॉरिडॉर ठरेल. यापूर्वी हावडा ते गुवाहाटी दरम्यान पहिली स्लीपर सेवा सुरू झाली आहे. या ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असतील. प्रवाशांच्या आरामाचा विचार करून बर्थची रचना करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान आवाज कमी येईल याची काळजी घेण्यात आली असून, यामुळे प्रवाशांना विमानासारखा प्रीमिअम अनुभव मिळेल. या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या आरोग्यासाठी अत्याधुनिक निर्जंतुकीकरण यंत्रणा आणि आधुनिक टॉयलेट्सची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांना झोपण्यासाठी विशेष एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले बर्थ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ज्यामुळे रात्रभराचा प्रवास थकवा विरहित होईल.