जाहिरात

Video: जे कोणालाही जमलं नाही ते महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीमुळे जमलं, मोदी- गांधी आले एकत्र, चर्चा काय?

याच सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गाठ पडली. राहुल गांधींनी हात जोडून पंतप्रधानांचे स्वागत केले.

Video: जे कोणालाही जमलं नाही ते महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीमुळे जमलं, मोदी- गांधी आले एकत्र, चर्चा काय?
नवी दिल्ली:

Modi Meet Rahul: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण देशाला माहित आहे. दोन्ही नेते एकमेकांनी खिंडीत गाठण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यात देशात पाच राज्यांच्या निवडणूका होत आहे. त्यात या दोघांनी एकमेकांवर जोरदार टिकेची झोड उठवली आहे.  त्यामुळे राजकीय वातावरण कमालीचे तापलेले आहे. अशा स्थितीत संसद परिसरात एक दुर्मिळ चित्र पाहायला मिळाले. निमित्त होते थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंती सोहळ्याचे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आले. विशेष म्हणजे, दोन्ही नेत्यांनी एकमेकांना हात जोडून अभिवादन केले. ऐवढेच नाही तर काही काळ त्यांच्यात औपचारिक चर्चाही झाली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

संसद भवनातील 'प्रेरणा स्थळ' येथे आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्या आधी त्यांचे आगमन झाले. त्या ठिकाणी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, राहुल गांधी, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. मोदी आल्यानंतर त्यांनी सर्वात आधी त्यांचे स्वागत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी केले. त्यानंतर  राहुल गांधी यांनी ही मोदी यांना नमस्कार केला. अन्य नेत्यांचे अभिवादन स्विकारल्यानंतर मोदी हे राहुल गांधी यांच्या जवळ गेले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. 

नक्की वाचा - Solapur News: जागा भाजपची तयारी शिवसेना शिंदे गटाची! हा पक्षप्रवेश शिंदेंसाठी 'गेमचेंजर' ठरणार?

मोदींनी राहुल गांधी यांना काही तरी विचारणा केली. त्यावर राहुल गांधी हे मोदींना काही तरी सांगत असताना दिसत आहे. यावेळी अन्य नेते या दोन्ही नेत्यांची चर्चा गांभिर्याने ऐकताना या व्हिडीओत दिसत आहे. संसदेच्या आवारात दोन्ही नेत्यांमधील हा संवाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर तुटून पडणारे हे दोन नेते संसदेच्या व्यासपीठावर एकत्र आल्याने लोकशाहीतील सुसंवादाचे दर्शन घडले. या व्हिडीओवर अनेक सकारात्मक कमेंट आल्या आहेत. भारताची हीच खरी लोकशाही अशा पद्धतीच्या कमेंटी ही आल्या आहे. अनेक वर्षानंतर हा क्षण देशाच्या राजकारणात पाहायला मिळाला. 

नक्की वाचा - Pune News: पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला मारहाण, Video होतोय Viral

पंतप्रधान मोदींनी या प्रसंगी सोशल मीडियावर महात्मा फुलेंना आदरांजली वाहताना म्हटले की, "फुले यांचे जीवन समानता, न्याय आणि शिक्षणासाठी समर्पित होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचितांच्या हक्कांसाठी खर्ची घातले. त्यांचे विचार आजही समाजाला प्रगतीची दिशा दाखवणारे आहेत." शिक्षण हे सक्षमीकरणाचे साधन मानणाऱ्या फुलेंच्या वारशाची देशाला गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र या सर्वात चर्चा होती ती मोदी आणि राहुल गांधी यांच्या भेटीची. याच सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गाठ पडली. राहुल गांधींनी हात जोडून पंतप्रधानांचे स्वागत केले, तर मोदींनीही तितक्याच आत्मीयतेने त्यांचे अभिवादन स्वीकारले.

नक्की वाचा - Baba Vanga: बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी! नवीन आठवड्यात 'या' 5 राशींचे नशीब फळफळणार, धनलाभ अन् प्रगतीचे योग

या दोन्ही नेत्यांमध्ये थोडा वेळ संवाद झाला. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहता, ते अत्यंत गंभीर विषयावर चर्चा करत असल्याचे जाणवत होते. सध्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत हे दोन्ही नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहेत, मात्र महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने हे वैर विसरून ते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. शिवाय तो तितक्याच वेगाने व्हायरल ही होत आहे. पहिल्यांदाच हे दोन्ही नेते आत्मियतेना एकमेकांसोबत बोलताना दिसत आहेत. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com