Best Bus fare : मुंबईकरांचा प्रवास महागला, बेस्ट बसचे भाडे दुप्पट! वाचा किती वाढले दर

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Best Bus fare : मुंबईतील प्रवासासाठी लोकलनंतर बेस्ट हे सर्वसामान्यांचं हक्काचं वाहन आहे. लाखो मुंबईकर बेस्टनं रोज प्रवास करतात. बेस्टमधून प्रवास करणाऱ्या सर्व मुंबईकरांच्या खिशाला गुरुवारपासून (8 मे 2025) त्रास सहन करावा लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेने बेस्ट बस भाडेवाढीला मंजुरी दिली होती. त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून होणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दुप्पट वाढले भाडे

बेस्ट बसच्या भाड्यात दुपटीने वाढ होणार आहे. त्यानुसार साध्या बससाठी किमान भाडं 5 रुपयांऐवजी 10 रुपये तर एसी बससाठी 6 रुपयांऐवजी 12 रुपये असेल.बेस्टने 2019 मध्ये प्रवासी संख्या वाढवण्यासाठी बस भाडे कमी केले होते. 20 किमी नंतर जास्तीत जास्त भाडे नॉन-एसी बसेससाठी 20 रुपये आणि एसी बसेससाठी 25 रुपये असे मर्यादित केले होते. आता कमाल अंतर स्लॅब 25 किमी पर्यंत सुधारित केला जाईल.

नॉन एसी बसची भाडेवाढ

5 किमी अंतरासाठी भाडे 10 रुपये (आधीचे भाडे 5 रुपये)
10 किमी अंतरासाठी भाडे 15 रुपये (आधीचे भाडे 10 रुपये)
15 किमी अंतरासाठी भाडे 20 रुपये (आधीचे भाडे 15 रुपये)
20 किमी अंतरासाठी भाडे 30 रुपये (आधीचे भाडे 20 रुपये)

( नक्की वाचा : Operation Sindoor : भारतीय लष्कराची पाकिस्तानवर कारवाई आणि चीनला इशारा! समजून घ्या अर्थ )
 

एसी बसची भाडेवाढ

5 किमी अंतरासाठी भाडे 12 रुपये (आधीचे भाडे 6 रुपये)
10 किमी अंतरासाठी भाडे 20 रुपये (आधीचे भाडे 13 रुपये)
15 किमी अंतरासाठी भाडे 30 रुपये (आधीचे भाडे 19 रुपये)
20 किमी अंतरासाठी भाडे 35 रुपये (आधीचे भाडे 25 रुपये )

Advertisement


मासिक पास देखील महाग

बेस्टचा मासिक पास देखील आता महाग झाला आहे. 

5 किमी अंतरासाठी 450 रुपये यापूर्वी मोजावे लागत होते आता हा पास 800 रुपयांना मिळणार आहे.
10 किमी अंतरासाठी भाडेवाढीनंतर मासिक पास - 1250 रुपये
15 किमी अंतरासाठी भाडेवाढीनंतर मासिक पास - 1700  रुपये
20 किमी अंतरासाठी भाडेवाढीनंतर मासिक पास - 2600  रुपये

एसी बसचा पास

5 किमी अंतरासाठी भाडेवाढीनंतर मासिक पास - 1100 रुपये
10 किमी अंतरासाठी भाडेवाढीनंतर मासिक पास - 1700  रुपये
15 किमी अंतरासाठी भाडेवाढीनंतर मासिक पास -  2300  रुपये
20 किमी अंतरासाठी भाडेवाढीनंतर मासिक पास - 3500 

Advertisement
Topics mentioned in this article