बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल (BMC Election 2026) 16 जानेवारी रोजी लागला. मुंबई महापालिकेमध्ये एकूण 227 जागा असून मुंबईमध्ये भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढत आहे. त्यांच्यापुढे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती करत आव्हान उभे केले होते. त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही साथ दिली होती. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनेही आघाडी करत ही निवडणूक लढवली होती. मुंबईत तिरंगी लढत पाहायला मिळाली होती.
नक्की वाचा: Jalgaon News: तुरुंगातून निवडणूक लढली आणि जिंकलीही; शिंदे गटाच्या ललित कोल्हेंची राज्यभर चर्चा
महायुती आणि महाआघाडीत चुरस
दुपारी एक वाजेपर्यंत जे कल हाती आले होते, त्यानुसार शिवसेना आणि भाजपा युतीचे 101 उमेदवार आघाडीवर होते तर ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) यांच्या आघाडीते 67 उमेदवार आघाडीवर होते. काँग्रेस आणि अन्य मिळून 9 जण आघाडीवर होते.
नक्की वाचा: BMC Election 2026: भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विजयी! ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांचा दारूण पराभव
मुंबईत कोण विजयी झाले ?
वॉर्ड 1 - रेखा यादव, शिवसेना (शिंदे)
वॉर्ड 2 - तेजस्वी घोसाळकर, (भाजपा)
वॉर्ड 9 - शिवानंद शेट्टी, भाजपा
वॉर्ड 19 - प्रकाश तावडे, भाजपा
वॉर्ड 20 - दीपक तावडे, भाजपा
वॉर्ड 32 - गीता भंडारी, शिवसेना (ठाकरे)
वॉर्ड 33 - मोईन सिद्दिकी, काँग्रेस
वॉर्ड 33 - अस्लम शेख यांची बहीण, काँग्रेस
वॉर्ड 37 - योगिता कदम, शिवसेना (ठाकरे)
वॉर्ड 50 - विक्रम राजपूत, भाजपा
वॉर्ड 52 - प्रीती साटम, भाजपा
वॉर्ड 73 - लोना रावत, शिवसेना (ठाकरे)
वॉर्ड 87 - पूजा महाडेश्वर, शिवसेना (ठाकरे)
वॉर्ड 103 - हेतल गाला, भाजपा
वॉर्ड 123 - सुनील मोरे, शिवसेना (ठाकरे)
वॉर्ड 124 - सकिना शेख, शिवसेना (ठाकरे)
वॉर्ड 134 - मेहजबीन खान, एम आय एम
वॉर्ड 135 - नवनाथ बन, भाजपा
वॉर्ड 145 - खैरुनिसा हुसेन, एम आय एम
वॉर्ड 165 - अश्रफ आझमी, काँग्रेस (नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक पराभूत)
वॉर्ड 172 - राजश्री शिरवाडकर, भाजपा
वॉर्ड 182 - मिलिंद वैद्य, शिवसेना (ठाकरे)
वॉर्ड 207 - रोहिदास लोखंडे, भाजपा
वॉर्ड 214 - अजय पाटील, भाजपा
वॉर्ड 215 - संतोष ढोले, भाजपा