जाहिरात

Jalgaon News: तुरुंगातून निवडणूक लढली आणि जिंकलीही; शिंदे गटाच्या ललित कोल्हेंची राज्यभर चर्चा

Jalgaon News: ललित कोल्हे यांचे चिरंजीव पियुष पियुष कोल्हे यांनी प्रभाग ४ 'ड' मधून दणदणीत विजय मिळवला. विजयाची अधिकृत घोषणा होताच पियुष कोल्हे यांनी आपल्या आईला घट्ट मिठी मारली.

Jalgaon News: तुरुंगातून निवडणूक लढली आणि जिंकलीही; शिंदे गटाच्या ललित कोल्हेंची राज्यभर चर्चा

मंगेश जोशी, जळगाव

जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाने आज सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेक महिन्यांपासून कारागृहात असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांनी तुरुंगातूनच निवडणूक लढवत आपला विजय नोंदवला आहे. केवळ ललित कोल्हेच नाही, तर त्यांचे चिरंजीव पियुष कोल्हे यांनीही विजय मिळवला असून, या विजयानंतर कोल्हे कुटुंबीयांना आनंद व्यक्त केला.

शिवसेना (शिंदे गट) कडून निवडणूक लढवणाऱ्या कोल्हे कुटुंबाने निर्भेळ यश संपादन केले आहे. या निकालात सर्वात जास्त चर्चा आहे ती माजी महापौर ललित कोल्हे यांची, ज्यांनी सध्या कारागृहात असूनही मतदारांचा कौल आपल्या बाजूने खेचून आणला.

(नक्की वाचा-  BMC Election 2026: भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विजयी! ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांचा दारूण पराभव)

पियुष कोल्हे यांचा विजय आणि भावूक क्षण

ललित कोल्हे यांचे चिरंजीव पियुष पियुष कोल्हे यांनी प्रभाग ४ 'ड' मधून दणदणीत विजय मिळवला. विजयाची अधिकृत घोषणा होताच पियुष कोल्हे यांनी आपल्या आईला घट्ट मिठी मारली. गेल्या काही काळापासून वडील तुरुंगात असल्याने कुटुंबावर असलेला मानसिक ताण या विजयाने हलका झाला आणि दोघांनाही अश्रू अनावर झाले.

(नक्की वाचा-  Maharashtra Election Result LIVE: पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची आघाडी, प्रशांत जगताप, रुपाली ठोंबरे पिछाडीवर)

ललित कोल्हे यांचा 'जेल'मधून विजय

माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय कठीण होती. एका गुन्ह्याप्रकरणी ते कारागृहात आहेत, मात्र त्यांच्या पत्नी आणि मुलाने त्यांच्या अनुपस्थितीत प्रचाराची धुरा सांभाळली. मतदारांनी कोल्हे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना विजयी केले आहे. तसेच ललित कोल्हे यांच्या मातोश्री सिंधू कोल्हे यांनीही निवडणूक लढवली असून, कोल्हे कुटुंबाची जळगावात पुन्हा एकदा पकड घट्ट झाल्याचे दिसून येत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com