Mumbai Central Station : विरार फास्टमधून चुकीच्या दिशेने उतरण्याचा प्रयत्न, लोखंडी कुंपणात मान अडकून तरुणाचा मृत्यू

लोकलमधून चढताना आणि उतरताना काळजी घेणं आणि रेल्वेच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. अन्यथा जीवही गमावू शकता.

जाहिरात
Read Time: 2 mins

लोकलमधून प्रवास करताना काही नियम पाळणं आवश्यक आहे. लोकलमधून चढताना आणि उतरताना काळजी घेणं आणि रेल्वेच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. अन्यथा जीव धोक्यात येऊ शकतो. मुंबई सेंट्रलला झालेला मृत्यू नियमांचं पालन न केल्याची परिणीती आहे. चुकीच्या दिशेने उतरणं या प्रवाशाला महागात पडलं. इतकं की या दुर्घटनेत याचा जीव गेला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई सेंट्रल स्थानकावर बुधवारी सकाळी एक विचित्र अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघाताचा एक धक्कादायक फोटोही समोर आला आहे. मुंबई सेंट्रल स्थानकावरुन विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून ही व्यक्ती प्रवास करीत होती. प्लॅटफॉर्मवरुन उतरण्याऐवजी हा प्रवासी विरुद्ध दिशेने उतरत होता. विरुद्ध दिशेने लोखंडी डिव्हायडर लावले होते. उतरत असताना चुकून त्याचं डोकं डिव्हायडरमध्ये अडकलं आणि यातच त्याचा अत्यंत विचित्र पद्धतीने मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Danapur Pune Express : दानापूर-पुणे एक्स्प्रेस तब्बल 17 तास उशीराने, प्रवाशांचे हाल

या व्यक्तीच्या खिशात मिळालेल्या आधारकार्डनुसार, याचं नाव धीला राजेश हमीरा भाई (27 वय) आहे. लोकलमधून चुकीच्या दिशेने उतरत असताना लोखंडी कुंपणात मान अडकून त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. या घटनेनंतर त्याला तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. 


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world