मुंबईत बुधवारी (25 सप्टेंबर) सुरु असलेल्या जोरदार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. घाटकोपर ते ठाणे या दरम्यान रुळावर पाणी साचलंय. त्यामुळे अप आणि डाऊन दिशेनं जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. संध्याकाळी घरी परतण्याच्या वेळेतच पाऊस आल्यानं कामाहून घरी परतणाऱ्या मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसानं बुधवारी दमदार हजेरी लावली. मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे महापालिका आयुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना तातडीच्या आणि महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. IMD द्वारे जारी केलेल्या रेड अलर्ट इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर वॉर्डाच्या कार्यकारी अभियंत्याला वॉर्ड कंट्रोल रूममध्ये उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
मुख्य अभियंता, स्ट्रॉम ड्रेनेज विभाग SWD कर्मचारी यांनी निर्जलीकरण पंप सुरु आहेत की नाही याची करावी. त्याचबरोबर खात्री करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुढील खात्री करण्यासाठी सांगण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी उपमुख्य अभियंता झोन यांना आज रात्री आपापल्या परिमंडळात उपस्थित राहावं असे आदेश देण्यात आले आहेत.