Mumbai Airport: लक्ष द्या! 7 मे रोजी मुंबई विमानतळ 6 तास बंद राहणार, मोठं कारण आलं समोर

विमान कंपन्यांना याबद्दल आधीच कळवण्यात आले असून, त्यांनी आपल्या विमानांच्या वेळा बदलल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) 7 मे 2026 रोजी धावपट्टीच्या देखभालीचे काम हाती घेण्यात येणार आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धावपट्टीची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी दरवर्षी हे पाऊल उचलले जाते. या नियोजित कामामुळे 7 मे रोजी सकाळी 11:00 ते संध्याकाळी 17:00 या सहा तासांच्या कालावधीत विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद राहतील. या वेळेत विमानांची उड्डाणे आणि लँडिंग पूर्णपणे थांबवण्यात येईल. पावसाळ्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही 'मान्सून रेडीनेस' मोहीम राबवली जात आहे.

विमानतळ प्रशासनाने या देखभालीच्या कामाचे नियोजन सहा महिने आधीच सुरू केले होते. सर्व विमान कंपन्या आणि संबंधितांना याची पूर्वकल्पना देण्यात आली आहे. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विमान फेऱ्यांच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करता येतील. 1033 एकर परिसरात पसरलेल्या या विमानतळाच्या पायाभूत सुविधांची तपासणी तज्ज्ञांमार्फत केली जाणार आहे. दरवर्षी पावसाळ्या आधी अशा पद्धतीचे काम केले जाते. त्यामुळे सात मेला जर तुम्ही काही बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Kalyan News: डान्सबार गर्ल ते ड्रग्ज सप्लायर! अलिशान घरातून 6 कोटींचे ड्रग्ज जप्त, घरातून चालवत होती रॅकेट

पावसाळ्यात विमानांचे लँडिंग आणि टेक-ऑफ सुरक्षित व्हावे, यासाठी धावपट्टीवरील झीज भरून काढणे आणि तांत्रिक दुरुस्ती करणे आवश्यक असते. अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने हे सहा तासांचे काम पूर्ण केले जाईल. प्रवाशांना कोणताही मनस्ताप होऊ नये आणि विमान वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी विमानतळ प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. विमानतळ प्रशासनाने (CSMIA) दिलेल्या माहितीनुसार, या कामाचे नियोजन गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. विमान कंपन्यांना याबद्दल आधीच कळवण्यात आले असून, त्यांनी आपल्या विमानांच्या वेळा बदलल्या आहेत. 

नक्की वाचा - Pune News: भाजप नेत्यांचा 'सेल्फ गोल'! काँग्रेसचा निषेध करायला आले पण भाजप विरोधातच नारे दिले, काय घडलं?

यामुळे ऐनवेळी प्रवाशांची धावपळ होणार नाही. धावपट्टीची तांत्रिक तपासणी करणे आणि पावसाळ्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विमानतळ सज्ज करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मुंबई विमानतळाचा परिसर खूप मोठा असून, विमानांच्या सुरक्षिततेसाठी धावपट्टीची स्थिती उत्तम असणे गरजेचे असते. तज्ज्ञ पथकामार्फत संपूर्ण 1033 एकर क्षेत्रातील एअरसाईड इन्फ्रास्ट्रक्चरची पाहणी केली जाईल. आधुनिक उपकरणांच्या मदतीने ठराविक वेळेत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विमानतळाची कार्यक्षमता आणि प्रवाशांची सुरक्षा याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.