जाहिरात

Pune News: भाजप नेत्यांचा 'सेल्फ गोल'! काँग्रेसचा निषेध करायला आले पण भाजप विरोधातच नारे दिले, काय घडलं?

सध्या पिंपरी-चिंचवडच्या गल्लीबोळात या 'सेल्फ गोल'ची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Pune News: भाजप नेत्यांचा 'सेल्फ गोल'! काँग्रेसचा निषेध करायला आले पण भाजप विरोधातच नारे दिले, काय घडलं?
  • पुण्यात भाजप आणि महायुतीने स्वतःच्या NDA सरकारविरोधात घोषणाबाजी केली
  • या आंदोलनात सत्ताधारी नेत्यांनी विरोधकांना लक्ष्य करण्याऐवजी स्वतःच्या सरकारचा निषेध केला
  • या चूक भूल घोषणांनी विरोधकांनी या सेल्फ गोलचा प्रसार सोशल मिडियावर केला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

सूरज कसबे 

राजकीय आंदोलनांच्या गडबडीत अनेकदा भान सुटल्याने नेत्यांची कशी फजिती होते, याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवडमध्ये आला. महिला आरक्षण विधेयकावरून महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी जमलेल्या भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी उत्साहाच्या भरात चक्क केंद्र व राज्यातील आपल्याच 'NDA' सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खसखस पिकली आहे. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात त्यामुळे या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची चर्चा रंगली आहे. निमित्त होते महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनाचे, पण उत्साहाच्या भरात सत्ताधारी नेत्यांनी चक्क स्वतःच्याच सरकारचा निषेध नोंदवला. या 'चूक भूल' आंदोलनामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे.

महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि मित्रपक्षांना लक्ष्य करण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी पक्षांनी निदर्शनांचे आयोजन केले होते. या आंदोलनात भाजप आमदार उमा खापरे, माजी महापौर रवी लांडगे आणि सत्ताधारी पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्यासह अनेक दिग्गज सहभागी झाले होते. भाजप सोबतच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते ही या आंदोलनात सहभागी झाले होते. एनडीएच्या घटक पक्षांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते. यात काँग्रेसचा निषेध करणे अपेक्षित होते. पण झाले उलटेच. या सर्वांना आपल्याच सरकारला लक्ष्य केले. 

नक्की वाचा - Kalyan News: डान्सबार गर्ल ते ड्रग्ज सप्लायर! अलिशान घरातून 6 कोटींचे ड्रग्ज जप्त, घरातून चालवत होती रॅकेट

आंदोलन रंगात आले असताना प्रशांत शितोळे यांनी "या सरकारचं करायचं काय?" अशी घोषणा दिली. त्यावर कार्यकर्त्यांनीही तितक्याच जोशात "खाली डोकं, वर पाय" म्हणत परिसर दणाणून सोडला. एकदा चूक झाल्यानंतर सावरण्याऐवजी, शितोळे यांनी पुन्हा एकदा "NDA सरकारचं करायचं काय?" असे विचारले, तरीही सर्वांनी पुन्हा तोच नारा लावला. केंद्रात आणि राज्यात आपलीच सत्ता असताना आपण कोणा विरोधात घोषणा देतोय, हे लक्षात येताच नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. आमदार उमा खापरे यांनी तातडीने हस्तक्षेप करत विजयाच्या घोषणा देऊन वेळ मारून नेली. मात्र तोपर्यंत हा 'सेल्फ गोल' सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.

नक्की वाचा - Shocking news: अस्वलाचं रूप घेऊन लावला 1 कोटींचा चुना, घोटाळ्याची पद्धत पाहून तुम्ही म्हणाल बाप रे बाप...

महापालिकेच्या परिसरात महायुतीच्या वतीने महाविकास आघाडीविरोधात निदर्शनं सुरू होती. यावेळी भाजप आमदार उमा खापरे आणि प्रशांत शितोळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी सुरू होती. मात्र, विरोधकांचे नाव घेण्याऐवजी प्रशांत शितोळे यांनी थेट 'NDA' सरकारविरोधातच घोषणा सुरू केल्या. "NDA सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सत्ता आपलीच आहे आणि आपण केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करतोय हे जेव्हा नेत्यांच्या लक्षात आले, तेव्हा एकच धावपळ उडाली. आमदार खापरेंनी तातडीने "NDA चा विजय असो" अशा घोषणा देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. सध्या पिंपरी-चिंचवडच्या गल्लीबोळात या 'सेल्फ गोल'ची चांगलीच चर्चा रंगली आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com