Mumbai Local News : मुंबई लोकलच्या 'या' स्टेशनचे नाव अचानक बदलले! काय आहे कारण?

Mumbai Local Station Name Change : नवी मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे!  

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai Local Station Name Change : नवी मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे!  आतापर्यंत सीवूड्स-दारावे (Seawoods–Darave) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलले आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनुसार भारतीय रेल्वेने या स्थानकाला नवी ओळख दिली असून, आता हे स्थानक 'सीवूड्स-दारावे-करावे' (Seawoods–Darave–Karave) या नावाने ओळखले जाईल. या नामकरणामुळे या परिसरातील करावे गावाच्या नावाचाही समावेश झाला आहे.  'सीवूड्स-दारावे-करावे' हे हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानक आहे.

का घेतला निर्णय?

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार भारतीय रेल्वेने हे नामकरण तातडीने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सीवूड्स-दारावे स्थानकाचे नाव बदलून 'सीवूड्स-दारावे-करावे' असे करण्यात आले आहे. स्थानकाच्या नावातील हा बदल अधिकृतपणे महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचनेनुसार आणि भारताच्या सर्व्हेअर जनरलच्या पत्रानुसार करण्यात आला आहे.

( नक्की वाचा : Pune News : खराडी, हडपसर, स्वारगेट ते खडकवासला... पुण्यातील नवा भाग मेट्रोनं जोडणार, वाचा A to Z माहिती )
 

 नवीन कोड काय?

रेल्वेच्या नोंदी आणि प्रवासी माहिती सुलभ व्हावी यासाठी स्थानकाचा कोडही बदलण्यात आला आहे. पूर्वीच्या 'सीवूड्स-दारावे' स्थानकाचा कोड आता बदलून नवा कोड SWDK असा निश्चित करण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांना स्थानकाचा उल्लेख करताना आणि तिकीट बुकिंग करताना या नवीन कोडचा वापर करावा लागणार आहे.

नामकरणानंतर या स्थानकाचे नाव तिन्ही प्रमुख लिपींमध्ये खालीलप्रमाणे वाचले आणि लिहिले जाईल

देवनागरी लिपी (मराठी/हिंदी): सीवूड्स-दारावे-करावे रोमन लिपी (इंग्रजी): SEAWOODS–DARAVE–KARAVE

रेल्वे यंत्रणेत बदल आणि प्रवाशांना आवाहन

या नामकरणानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने सर्व आवश्यक बदल सुरू केले आहेत. या बदलांमध्ये स्थानकाच्या सर्व नोंदी, दिशादर्शक फलक (signages), रेल्वे घोषणा प्रणाली (announcement system) तसेच प्रवासी माहिती प्रणाली (Passenger Information System) यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी नवीन नावाचा समावेश करून ते अद्ययावत केले जाणार आहेत.

Advertisement

रेल्वे प्रशासनाने लोकल आणि एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना व सामान्य नागरिकांना विनंती केली आहे की त्यांनी या नामकरणाच्या बदलाची नोंद घ्यावी आणि त्यानुसार नवीन नावाचा वापर करावा.
 

Topics mentioned in this article