Mumbai Local News: मध्य रेल्वेची वाहतूक गर्दीच्या वेळी विस्कळीत; विक्रोळी-कांजूरमार्गदरम्यान रेल्वे रुळाला तडे
ऋतिक गणकवार, मुंबई
Mumbai News: मुंबईहून ठाणे कडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. तांत्रिक कारणामुळे ठाणेकडे जाणारी मार्गिका बंद झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.
विक्रोळी आणि कांजूरमार्ग दरम्यान धीम्या लोकल मार्गावर रेलचे फ्रॅक्चर आढळले आहे. धीम्या लोकल माटुंगा येथून फास्ट लाईनवर या कालावधीसाठी वळवण्यात आल्या आहे. रेल्वे प्रशासाने बिघाड दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.