AC Local On Western Railway Line: मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल प्रवासात आता थंडावा आणखी वाढणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून 26 जानेवारी 2026 म्हणजेच प्रजासत्ताक दिनी 12 नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. वाढता उकाडा आणि गर्दीमुळे मुंबईकर एसी लोकलला पसंती देत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विरार, बोरिवली, भाईंदर आणि गोरेगाव या मार्गांवर नवीन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये अप दिशेला सहा आणि डाऊन दिशेला सहा अशा एकूण 12 फेऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये फास्ट आणि स्लो अशा दोन्ही प्रकारच्या गाड्यांचा समावेश करण्यात आलाय, जेणेकरून नोकरीवर जाणाऱ्या आणि घरी परतणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा लाभ मिळेल.
एसी लोकलचे नवीन सविस्तर वेळापत्रक | AC Local TimeTable On Western Line
अप मार्ग (चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या गाड्या):
- सकाळी 05:14 वाजता गोरेगाववरून सुटणारी स्लो लोकल सकाळी 06:11 वाजता चर्चगेटला पोहोचेल.
- सकाळी 07:25 वाजता बोरिवलीवरून सुटणारी फास्ट लोकल सकाळी 08:20 वाजता चर्चगेटला पोहोचेल.
- सकाळी 10:08 वाजता विरारवरून सुटणारी फास्ट लोकल सकाळी 11:27 वाजता चर्चगेटला पोहोचेल.
- दुपारी 12:44 वाजता भाईंदरवरून सुटणारी फास्ट लोकल दुपारी 13:48 वाजता चर्चगेटला पोहोचेल.
- दुपारी 15:45 वाजता विरारवरून सुटणारी स्लो लोकल संध्याकाळी 17:09 वाजता चर्चगेटला पोहोचेल.
- संध्याकाळी 19:06 वाजता गोरेगाववरून सुटणारी स्लो लोकल रात्री 20:01 वाजता चर्चगेटला पोहोचेल.
(नक्की वाचा: Nanded News: नांदेडला जाणार असाल तर ही बातमी वाचा; रेल्वेने जाहीर केल्या विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस)
डाऊन मार्ग (चर्चगेटवरून सुटणाऱ्या गाड्या):
- सकाळी 06:14 वाजता चर्चगेटवरून सुटणारी स्लो लोकल सकाळी 07:19 वाजता बोरिवलीला पोहोचेल.
- सकाळी 08:27 वाजता चर्चगेटवरून सुटणारी फास्ट लोकल सकाळी 09:51 वाजता विरारला पोहोचेल.
- सकाळी 11:30 वाजता चर्चगेटवरून सुटणारी फास्ट लोकल दुपारी 12:31 वाजता भाईंदरला पोहोचेल.
- दुपारी 13:52 वाजता चर्चगेटवरून सुटणारी स्लो लोकल दुपारी 15:36 वाजता विरारला पोहोचेल.
- संध्याकाळी 17:57 वाजता चर्चगेटवरून सुटणारी स्लो लोकल संध्याकाळी 18:51 वाजता गोरेगावला पोहोचेल.
- रात्री 20:07 वाजता चर्चगेटवरून सुटणारी स्लो लोकल रात्री 21:02 वाजता गोरेगावला पोहोचेल.