अट्टल चोर! रेल्वे रुळावर बदलायचा कपडे, 41 लाखांची जमवली माया पण एक चूक अन् खेळ खल्लास

मार्च महिन्यापासून मालाड पोलिस या चोराच्या मागावर होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

36 तोळे सोनं, 1 किलो चांदी, 13 लाखाची कॅश, 10 लाखाची जमिन, फ्लॅट खरेदीसाठी 6 लाखांची कॅश. हे सर्व ऐश्वर्य पाहिल तर तुम्हाला वाटेल कुणी तरी सदन घरातल्या वक्तीची ही जमापूंजी असेल. पण तसं अजिबात नाही. हे सर्व काही आहे ते एका अट्टल चोराचं. त्यांने पोलिसांना चकवा देत हा कारनामा केला आहे. पण शेवटी पोलिस ते पोलिस त्यांनी या अट्टल चोराला शेवटी आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. त्यानंतर तो आता पोलिसांचा पाहुणा झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबईतील मालाड पोलिसांनी एका अट्टल चोराला अटक केली आहे. तो चोरी करण्यासाठी दिवसा रेकी करायचा आणि रात्री चोरी करून फरार व्हायचा. या अट्टल चोराने मालाड, कांदिवली, बोरीवली आणि दिंडोशी परिसरात अनेक चोऱ्या केल्या होत्या. हा चोर रेल्वे स्थानकाजवळील परिसरात चोऱ्या करायचा. तिथली श्रीमंतांची घरं तो हेरायचा. बरं तो चोरी करताना एक विशेष काळजी घ्यायचा. पोलिस आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी हा चोर रेल्वे रुळांवर कपडे बदलायचा. त्यानंतर तो पुन्हा स्थानक परिसरात येवून चोरी करायचा. त्यामुळे त्याला पकडणं अवघड बनलं होतं. 

ट्रेंडिंग बातमी - 'रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का?',अंधारे-चाकणकर यांच्यात जुंपली, एकमेकींना थेट...

अटक केलेल्या आरोपीचे नाव रणजित कुमार उपेंद्र कुमार सिंग उर्फ मुन्ना असे आहे. तो मुळचा बिहारमधील खगरिया येथील रहिवासी आहे. आरोपीकडून हिऱ्यांनी जडलेले 36 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, 1 किलो चांदी, बँकेत 13 लाख रुपये, सोने वितळवण्याचे मशीन, घरफोडी करण्यासाठी वापरलं जाणारं कटर, हातोडा हस्तगत करण्यात आलं आहे. अशी जवळपास 41 लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच, बिहारमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपये त्याने दिले होते. शिवाय मालवणीमध्ये घर खरेदी करण्यासाठी 6 लाख रुपये रोख दिले होते. मालाड पोलिसांनी त्याला ताब्यात घेत हा सर्वमुद्देमाल जप्त केला आहे.  

ट्रेंडिंग बातमी - Shivsena Vs Ajit pawar: शिवसेनेचे मंत्री अजित पवारांविरोधात नाराज? एकनाथ शिंदें बरोबरच्या बैठकीत काय झालं?

मार्च महिन्यापासून मालाड पोलिस या चोराच्या मागावर होते. एक महिनाभर मालाड पोलिसांनी रेल्वे रुळांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास केला. 100 ते 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तेव्हा कुठे हा आरोपी मालवणीमध्ये जाताना दिसला. पुढे मालाड पोलिसांनी मालवणीमध्ये सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीच्या अटकेमुळे 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये आणखी किती लोक सामील होते आणि चोऱ्या कोठे-कोठे केल्या आहेत, याचा तपास मालाड पोलिस करत आहेत.

Advertisement