Mumbai News : मुंबईच्या महापौर रितू तावडेंचा ताफा अचानक थांबवला, 'या' उड्डाणपुलावर असं काही घडलं..पाहा व्हिडीओ

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर वाहनातील तेल गळती झाल्याने अपघात घडला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Mayor Ritu Tawde Convoy Video

Mumbai Mayor Ritu Tawde News Today : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर वाहनातील तेल गळती झाल्याने अपघात घडला. या मार्गावरून जाणाऱ्या काही दुचाकी रस्त्यावर घसरल्या. त्यामुळे दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाहीय. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या महापौर रितू तावडे या एका सोहळ्यासाठी विक्रोळी येथून पवईकडे जात असताना त्यांच्या वाहनाच्या ताफ्यापासून काही अंतरावर ही घटना घडली. 

महापौरांनी  दुचाकीस्वारांना सावरलं आणि..

विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर वाहनातील तेल गळती झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. ही घटना घडल्यानंतर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या काही दुचाकी तेल गळतीमुळे घसरल्या आणि अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वारांना गंभीर दुखापत झाली नाही. परंतु, त्यांच्यावार प्राथमिक उपचार केल्याची माहिती समोर आलीय. 

Advertisement

नक्की वाचा >> Pune News : पुण्यात 'या' भागात कोयता गँगची दहशत, सोसायटीतील घरांची केली तोडफोड, CCTV व्हिडीओ व्हायरल

महापौर रितू तावडे यांनी तातडीनं वाहनांचा ताफा थांबवून या दुचाकीस्वारांना सावरलं आणि त्यांची विचारपूस केली. तसेच वाहतूक पोलिसांना तत्काळ पाचारण करून वाहतूक सुरक्षित करण्यासाठी निर्देश दिले. तसेच या दुचाकीस्वारांना आवश्यक ते प्रथमोपचार करण्यासाठी सूचना दिल्या.   महानगरपालिकेचे प्रशासकीय विभाग कार्यालय, अग्निशमन दल आणि पूल विभाग यांच्याशी महापौरांनी संपर्क साधला. सर्व संबंधित खात्यांनी आपापसात समन्वय साधून पुलावरून वाहतूक सुरळीत व्हावी,यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. 

नक्की वाचा >> Shirdi News: अशोक खरातचं शिर्डी कनेक्शन आलं समोर, शिर्डी अन् परिसरात असं काही केलं..सर्वत्र उडालीय खळबळ!