Mumbai Metro 2B: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 2B चा पहिला टप्पा 'या' महिन्यात सुरू, वाचा सर्व अपडेट

Mumbai Metro 2B Update: मुंबईतील बहुप्रतीक्षित 'यलो लाईन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन 2 चे (Metro Line 2) काम आता अंतिम टप्प्यात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Metro 2B : हा मार्ग सुरू झाल्यावर चेंबूर, गोवंडी आणि मानखुर्द येथील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
मुंबई:

Mumbai Metro 2B Update: मुंबईतील बहुप्रतीक्षित 'यलो लाईन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन 2 चे (Metro Line 2) काम आता अंतिम टप्प्यात आहे.  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) विकसित केलेला हा 23.6 किलोमीटरचा कॉरिडॉर मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

हा मेट्रो मार्ग दोन भागांमध्ये विभागला गेला आहे: लाईन 2A (दहिसर ते डी.एन. नगर), जी आधीच कार्यान्वित आहे, आणि लाईन 2B (डी.एन. नगर ते मानखुर्द येथील मंडाले), ज्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.

कधी सुरु होणार मार्ग?

 मेट्रो लाईन 2B चा पहिला टप्पा (Phase 1), जो मंडाले ते चेंबूरमधील डायमंड गार्डन डिसेंबरमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. 5.3 किलोमीटरच्या या मार्गावर सध्या चाचणी (Trial Runs) सुरु आहे.  हा मार्ग सुरू झाल्यावर चेंबूर, गोवंडी आणि मानखुर्द येथील प्रवाशांसाठी पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी (East-West Connectivity) सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडेल.

( नक्की वाचा : Mumbai Metro: मुंबई मेट्रोचे वेळापत्रक बदलले: सलग 7 दिवस 'या' 2 मार्गांवर सकाळी रेल्वे उशिरा धावणार; वाचा बदल
 

दुसरा टप्पा कधी?

मेट्रो लाईन 2B चा दुसरा टप्पा हा डी.एन. नगर ते खारमधील सारस्वत नगरपर्यंतचा आहे. तो पुढील वर्षी (2026) उन्हाळ्यापर्यंत सुरु होण्याची अपेक्षा आहे.  हा टप्पा कार्यान्वित झाल्यावर तो लाईन 2A शी जोडला जाईल, ज्यामुळे दहिसर ते खारपर्यंत एक सलग मेट्रो मार्ग तयार होईल.

दुसऱ्या टप्प्यात कोणते स्टेशन्स?

या दुसऱ्या टप्प्यातील प्रस्तावित स्थानकांमध्ये ईएसआईसी नगर (ESIC Nagar), प्रेम नगर (Prem Nagar), इंदिरा नगर (Indira Nagar), नानावटी हॉस्पिटल (Nanavati Hospital), खिरा नगर (Khira Nagar) आणि सारस्वत नगर (Saraswat Nagar) यांचा समावेश आहे. लिंक रोड आणि एसव्ही रोड मार्गावरील व्यस्त वाहतुकीला या स्टेशन्सचा फायदा होईल,.

Advertisement

बांद्रा (पश्चिम), बीकेसी (BKC), कुर्ला (Kurla) आणि चेंबूर (Chembur) दरम्यानचा मध्यवर्ती भाग पूर्ण होण्यास अधिक वेळ लागणार आहे, ज्याची कोणतीही निश्चित अंतिम मुदत (Deadline) अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

( नक्की वाचा : Mumbai Metro: मुंबई मेट्रोचे वेळापत्रक बदलले: सलग 7 दिवस 'या' 2 मार्गांवर सकाळी रेल्वे उशिरा धावणार; वाचा बदल
 

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CMRS) पहिल्या टप्प्यातील कामांसाठी आवश्यक असलेल्या मंजुरी मिळाल्या आहेत. मात्र, मेट्रो प्रणालीची मजबुती सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त चाचण्या ) सुरू आहेत.

Advertisement

10,986 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला अनेक वर्षांमध्ये अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. कंत्राटदारांची अकार्यक्षमता, पॉवर ट्रान्समिशन लाईन्स (Power Transmission Lines) स्थलांतरित करणे आणि अन्य कामातील अडथळ्यांमुळे हा प्रकल्प रखडला आहे.  

Topics mentioned in this article