जाहिरात

Mumbai Metro 3 Aqua Line: मुंबई मेट्रो 3 चा अंतिम टप्पा उद्घाटनासाठी सज्ज; वाचा संपूर्ण मार्ग आणि तिकीट दर

Mumbai Metro 3 Aqua Line: मुंबई मेट्रो मार्गाच्या 3 (Aqua Line) च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन बुधवारी (8 ऑक्टोबर 2025) होणार आहे.

Mumbai Metro 3 Aqua Line: मुंबई मेट्रो 3 चा अंतिम टप्पा उद्घाटनासाठी सज्ज; वाचा संपूर्ण मार्ग आणि तिकीट दर
Mumbai Metro 3 Aqua Line: या मार्गावर दररोज 17 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे.
मुंबई:

Mumbai Metro 3 Aqua Line: मुंबईच्या वाहतूक इतिहासातील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई मेट्रो मार्गिका 3 (Aqua Line) च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन बुधवारी (8 ऑक्टोबर 2025)  होणार आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे मुंबईतील पहिली संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्गिका पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आचार्य अत्रे चौक (वरळी) ते कफ परेड या अंतिम आणि अत्यंत महत्त्वाच्या पट्ट्याचे उद्घाटन होणार आहे, ज्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार आहे.

मुंबईची 'पहिली भूमिगत' मेट्रो

हा मेट्रो मार्ग एकूण 33.5 किलोमीटर लांबीचा असून, आरे कॉलनी (उत्तर) ते कफ परेड (दक्षिण) यांना जोडतो. हा मुंबईतील पहिला संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्ग आहे, ज्यामुळे शहराच्या दक्षिणेकडील व्यावसायिक केंद्रे पश्चिम आणि मध्य उपनगरांशी थेट जोडली जातील.

या मार्गावर एकूण 27 स्टेशन्स आहेत. आरे डेपो वगळता सर्वच्या सर्व स्टेशन्स भूमिगत (Underground) आहेत. रस्त्याने आरे ते कफ परेड हे अंतर पार करण्यासाठी सामान्यतः 2 तासांहून अधिक वेळ लागतो, मात्र आता मेट्रो-3 मुळे हा प्रवास अवघ्या 54 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.

( नक्की वाचा : Mumbai Metro 3: मुंबईची Aqua Line पूर्ण क्षमतेने सुरू होणार! पाहा स्टेशन्सचा First Look; वाचा खास वैशिष्ट्ये )
 


या 11 स्टेशन्सचे होणार उद्घाटन

बुधवारी म्हणजेत 8 ऑक्टोबर रोजी आचार्य अत्रे चौक (वरळी) ते कफ परेड या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरील खालील 11 स्टेशन्स प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत. या स्टेशन्सची मराठी आणि इंग्रजी नावे खालीलप्रमाणे:

विज्ञान संग्रहालय (Science Museum)
महालक्ष्मी (Mahalaxmi)
जगन्नाथ शंकरशेट (Mumbai Central Interchange)
ग्रँट रोड (Grant Road)
गिरगाव (Girgaon)
काळबादेवी (Kalbadevi)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)
हुतात्मा चौक (Hutatma Chowk)
चर्चगेट (Churchgate)
विधान भवन (Vidhan Bhavan)
कफ परेड (Cuffe Parade)

संपूर्ण 'अ‍ॅक्वा लाइन' वरील स्टेशन्सची नावे (आरे ते कफ परेड)

आरे JVLR (Aarey JVLR)
सीप्ज (Seepz)
अंधेरी MIDC (Andheri MIDC)
मरोळ नाका (Marol Naka)
CSMIA टी2 (CSMIA T2)
सहारा रोड (Sahara Road)
CSMIA टी1 (CSMIA T1)
सांताक्रूझ (Santacruz)
वांद्रे कॉलनी (Bandra Colony)
बीकेसी (Bandra Kurla Complex)
धारावी (Dharavi)
शीतलादेवी मंदिर (Sitaladevi Temple)
दादर मेट्रो (Dadar Metro)
सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Temple)
वरळी (Worli)
आचार्य अत्रे चौक (Acharya Atre Chowk)
विज्ञान संग्रहालय (Science Museum)
महालक्ष्मी (Mahalaxmi)
मुंबई सेंट्रल (Mumbai Central)
ग्रँट रोड (Grant Road)
गिरगांव (Girgaon)
काळबादेवी (Kalbadevi)
सीएसएमटी (CSMT)
हुतात्मा चौक (Hutatma Chowk)
चर्चगेट (Churchgate)
विधान भवन (Vidhan Bhavan)
कफ परेड (Cuffe Parade)

( नक्की वाचा : NMIA : लंडन-दुबईसारखा अनुभव महाराष्ट्रात! कसं असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ? वाचा A to Z माहिती )
 


इतर वाहतूक मार्गांशी थेट कनेक्टिव्हिटी

या मेट्रो मार्गिकेमुळे मुंबईच्या सध्याच्या वाहतूक जाळ्याशी थेट जोडणी साधली जाणार आहे.

उपनगरीय रेल्वे: मुंबई सेंट्रल, सीएसएमटी आणि चर्चगेट येथे उपनगरीय रेल्वेशी इंटरचेंज उपलब्ध असेल.
मेट्रो लाइन 1: मरोळ नाका येथे मेट्रो मार्गिका 1 (घाटकोपर-वर्सोवा) शी जोडणी.
विमानतळ: देशांतर्गत (T1) आणि आंतरराष्ट्रीय (T2) विमानतळांना थेट कनेक्टिव्हिटी.


तिकीट दर (Fare Structure):

मुंबई मेट्रो 3 मध्ये अंतरावर आधारित तिकीट दर रचना लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे सर्व प्रवाशांना परवडणारे भाडे निश्चित करण्यात आले आहे.प्रवाशांना 3 किमी पर्यंतच्या अंतरासाठी 10 रुपये मोजावे लागतील. ज्या प्रवासाचे अंतर 3 ते 12 किमी दरम्यान असेल, त्यांना 20  रुपये  शुल्क आकारले जाईल, तर 12 ते 18 किमीच्या मध्यम-अंतरासाठी  30  रुपये  तिकीट असेल. त्याहून अधिक, 18 ते 24 किमी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना  40  रुपये  आणि 24 ते 30 किमीसाठी  50  रुपये  भरावे लागतील.  30 ते 36 किमीच्या प्रवासासाठी तिकीट 60  रुपये  दर निश्चित करण्यात आला आहे.  तुम्ही तिकीट दर https://mmrcl.com/en/fare-recharge या अधिकृत वेबसाईटला चेक करु शकता. 

प्रमुख स्टेशनसाठी लागणारा तिकीट दर

आचार्य अत्रे चौक ते कफ परेड: 40 रुपये
आरे JVLR ते कफ परेड:  70 रुपये
आरे JVLR ते सिद्धिविनायक: 60 रुपये
दादर मेट्रो ते चर्चगेट मेट्रो:  50 रुपये


या मार्गावर दररोज 17 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होऊन आर्थिक राजधानीच्या दळणवळणाची व्याख्या नव्याने निश्चित होण्यास मदत होईल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com