Mumbai Metro 3: मुंबईची Aqua Line पूर्ण क्षमतेने सुरू होणार! पाहा स्टेशन्सचा First Look; वाचा खास वैशिष्ट्ये

Mumbai Metro 3: मुंबईकरांसाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी! बहुप्रतिक्षित मुंबई मेट्रो-3 (Mumbai Metro-3) ची पहिली पूर्णपणे भूमिगत 'अक्वा लाईन' (Aqua Line) आता पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास सज्ज झाली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Mumbai Metro 3: या आधुनिक स्थानकांमुळे मुंबईचा उत्तर-दक्षिण प्रवास अधिक वेगवान आणि सोयीचा होईल.
मुंबई:

Mumbai Metro 3: मुंबईकरांसाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी! बहुप्रतिक्षित मुंबई मेट्रो-3 (Mumbai Metro-3) ची पहिली पूर्णपणे भूमिगत 'अक्वा लाईन' (Aqua Line) आता पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास सज्ज झाली आहे. वरळी ते कफ परेडपर्यंतच्या या महत्त्वाच्या टप्प्यामुळे आता कफ परेड ते सीप्झ/आरे पर्यंत अखंड कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या टप्प्यात विज्ञान केंद्र, महालक्ष्मी, CSMT, हुतात्मा चौक आणि चर्चगेट यासह 11 भूमिगत स्टेशन प्रवाशांसाठी खुली होतील. या आधुनिक स्थानकांमुळे मुंबईचा उत्तर-दक्षिण प्रवास अधिक वेगवान आणि सोयीचा होईल.

दुसरा आणि अंतिम टप्पा होणार सुरु

वरळी (Worli) ते कफ परेड (Cuffe Parade) पर्यंतचा हा मेट्रो-3 चा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यात विज्ञान केंद्र (Science Centre) स्टेशनपासून कफ परेडपर्यंत एकूण 11 भूमिगत स्थानके (Underground Stations) कार्यान्वित होतील.

या मार्गावरील प्रमुख स्टेशन खालीलप्रमाणे आहेत

  • विज्ञान केंद्र (Science Centre)
  • महालक्ष्मी (Mahalaxmi)
  • जगन्नाथ शंकरशेट (Mumbai Central Interchange)
  • ग्रँट रोड (Grant Road)
  • गिरगाव (Girgaon)
  • काळबादेवी (Kalbadevi)
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)
  • हुतात्मा चौक (Hutatma Chowk)
  • चर्चगेट (Churchgate)
  • विधान भवन (Vidhan Bhavan)
  • कफ परेड (Cuffe Parade)


( नक्की वाचा : Mumbai Local : मध्य रेल्वेचा मोठा दिलासा! दोन नवी स्टेशन आणि 20 अतिरिक्त लोकल लवकरच सेवेत, वाचा संपूर्ण प्लॅन )
 

कनेक्टिव्हिटी आणि प्रमुख आकर्षण 

या पूर्ण झालेल्या टप्प्यामुळे मुंबईतील अनेक महत्त्वाचे भाग आता थेट मेट्रो कनेक्टिव्हिटीने जोडले जातील. मुंबई मेट्रोनं सर्व स्टेशन्सचे आकर्षक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ही स्टेशन आधुनिकतेचा आणि मुंबईच्या वारसाचा योग्य संगम असल्याचं स्पष्ट होतं.

मेट्रो 3 ची ही नवी स्टेशन्स आतून कशी दिसतात? त्याचं वैशिष्ट्य आणि महत्त्व काय हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

विज्ञान केंद्र (Science Centre)

नेहरू विज्ञान केंद्र (Nehru Science Centre) हे दक्षिण मुंबईतील वरळीमधील मेट्रोचे स्टेशन आहे. नेहरू तारांगण (Nehru Planetarium), महालक्ष्मी मंदिर, हाजी अली दर्गा (Haji Ali Dargah) आणि फिनिक्स पॅलेडियम (Phoenix Palladium) मॉलसाठी जाण्यासाठी हे स्टेशन उपयोगी ठरेल.

Advertisement

महालक्ष्मी (Mahalaxmi)

पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी उपनगरीय स्थानक (Suburban Station), मोनोरेल (Monorail), महालक्ष्मी रेसकोर्स (Racecourse) आणि हाजी अली दर्गा जाण्यासाठी उपयुक्त आहे. 

जगन्नाथ शंकरशेट (Mumbai Central)

 मुंबई सेंट्रल उपनगरीय रेल्वे स्थानक (Suburban Railway Station) आणि आंतर-राज्यीय बस स्थानकाशी सोपा इंटरचेंज म्हणून हे मेट्रो स्टेशन महत्त्वाचे आहे. 

ग्रँट रोड (Grant Road)

शहरतील सर्वाधिक गजबजलेल्या परिसरांपैकी एक असलेल्या ग्रँट रोड (पूर्व व पश्चिम) भागात शाळा, रुग्णालये, बाजारपेठांना अखंड कनेक्टिव्हिटी या स्टेशनमुळे मिळणार आहे.

गिरगाव (Girgaon)    

मुंबईतील गिरगाव मेट्रो स्टेशनची सर्वांनाच उत्सुकता आहे.  शंभर वर्षांहून जुन्या इमारतींच्या शेजारी उभारलेले हे भुयारी स्टेशन हे इंजिनिअरिंगचं अद्भुत उदाहरण आहे.

Advertisement

काळबादेवी (Kalbadevi)    

आधुनिक 'NATM' तंत्रज्ञान वापरून हे स्टेशन तयार करण्यात आलं आहे. मुंबईतील महत्त्वाच्या भागातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागाला हे स्टेशन जोडणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)

मध्य रेल्वेचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन हे सर्वांनाच माहिती आहे. देशातील सर्वात गजबजलेल्या स्टेशनमध्ये याचा समावेश होतो. आता हे स्टेशन मेट्रोच्या नकाशावरही आलं आहे. भुयारी मार्गानं Subway) सीएसएमटी उपनगरीय रेल्वे स्टेशनला हे मेट्रो स्टेशन जोडण्यात आलं आहे. त्याचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

Advertisement

हुतात्मा चौक (Hutatma Chowk)

मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court), बीएसई (BSE), आरबीआय मुख्यालय (RBI Headquarters), फ्लोरा फाउंटन (Flora Fountain) यांसारख्या आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्रांशी थेट कनेक्टिव्हिटी या स्टेशनमुळे होईल.

चर्चगेट (Churchgate)    

मरीन ड्राइव्ह (Marine Drive), नरिमन पॉईंट (Nariman Point), मंत्रालय, वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium), गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India) आणि मुंबई विद्यापीठासाठी (Mumbai University) या स्टेशमुळे त्वरित ॲक्सेस मिळेल.

विधान भवन (Vidhan Bhavan)

'अक्वा लाईन' द्वारे विधान भवन, मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये थेट भूमिगत प्रवेश (Underground Access) मिळणार आहे.

संपूर्ण मेट्रो-3 मार्गावर एकूण 26 भूमिगत स्थानके आणि 1 जमिनीवरील स्टेशन आहे. हा मार्ग सुरू झाल्याने मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीचा होईल, तसेच दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या व्यावसायिक आणि वारसा स्थळांवर पोहोचणे जलद होईल. या प्रकल्पामुळे मुंबईच्या उत्तर-दक्षिण कनेक्टिव्हिटीला मोठा वेग मिळणार आहे.
 

Topics mentioned in this article